काेराेनाचा धसका, चीनमध्ये भारतीयांना केली प्रवेशबंदी, २० प्रवाशांना लागण झाल्यानंतर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 02:05 AM2020-11-06T02:05:56+5:302020-11-06T06:56:49+5:30
CaronaVirus News in China : एअर इंडियातर्फे १३ नाेव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत ४ विमानांचे नियाेजन करण्यात आले हाेते. त्यावर आता परिणाम हाेण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : काेराेना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे चीनने भारतीयांना देशात प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात वंदे भारत माेहिमेतून एअर इंडियाच्या विमानाने वुहानला गेलेल्या २० प्रवाशांना विषाणूची लागण झाल्यानंतर चीनने हे पाऊल उचलले आहे.
ही बंदी तात्पुरती असल्याचे चीनने सांगितले आहे.
एअर इंडियातर्फे १३ नाेव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत ४ विमानांचे नियाेजन करण्यात आले हाेते. त्यावर आता परिणाम हाेण्याची शक्यता आहे. चीनी राजनैतिक तसेच ‘सी’व्हीसाधारकांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. चीनमधील वुहान प्रांतामधून काेविड १९ विषाणूचा प्रसार झाला हाेता. संसर्ग नियंत्रणात आणल्यानंतर या भागात पुन्हा नवे रुग्ण आढळले हाेते. त्यामुळे प्रसार राेखण्यासाठी चीनला पुन्हा उपाययाेजना करावी लागत आहे. त्यासाठी विमान कंपन्यांना नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या हाेत्या.