मुलीवरील उपचारांसाठी मांजरांचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:01 AM2017-08-18T05:01:50+5:302017-08-18T05:01:51+5:30
केस नसलेल्या या मांजरींचे हे लग्न तुम्हाला विचित्र वाटेल परंतु या लग्नाचे कारणही हृदय हेलावून टाकणारे आहे.
केस नसलेल्या या मांजरींचे हे लग्न तुम्हाला विचित्र वाटेल परंतु या लग्नाचे कारणही हृदय हेलावून टाकणारे आहे. ख्रिस्ती आणि लिली अशी या मांजरींची नावे असून मर्सेसाईड येथील सेंट हेलेन्समधील बीअर गार्डनमध्ये त्यांचा विवाह समारंभपूर्वक लावण्यात आला.
बीअर गार्डनमध्ये आलेले मद्यशौकिन वºहाडी म्हणून उपस्थित होते. या लग्नाची तयारी काही दिवस चालली. पाच वर्षांची केसी टर्नर ही मुलगी अत्यंत दुर्मिळ असलेल्या बॅटन नावाच्या आजाराने त्रस्त असून तिच्या उपचारांसाठी या मांजरींच्या जोडप्याच्या लग्नातून पैसे उभे केले गेले.
ओ. मारियालैना अॅशक्रॉफ्ट या बार्इंना मांजरांचे फारच वेड आहे. त्यांच्याकडे आठ मांजरी आहेत. अॅशक्रॉफ्ट यांनी हे लग्न जुळवून आणले व आपल्या आवडत्या मांजरी त्यासाठी दिल्या. मारियालैना म्हणाल्या की, केसीच्या प्रकृतीबद्दल
आमच्या समाजात सगळ््यांना कल्पना आहे आणि तिला काही तरी मदत करावी, असे मला वाटत होते.
अॅशक्रॉफ्ट स्थानिक ‘पेट फ्रेंडली पब’मध्ये गेल्या व तेथे त्यांनी लग्नाची कल्पना मांडली. पबमधील सगळ््यांनी सगळ््या गोष्टींचे त्यांना सहकार्य केले. अॅशक्रॉफ्ट यांचा मित्र नेहमीच त्यांच्या आवडत्या जनावरांवरील प्रेमाबद्दल बोलत असतो.
मांजरींच्या लग्नाच्या माध्यमातून पैसे उभे करण्याच्या अनोख्या पद्धतीचेही त्याने कौतूक केले. केसीला दर दोन आठवड्यांनी ग्रेट आॅर्मोंंड स्ट्रीट हॉस्पिटलला तिच्या कुटुंबीयांसोबत प्रवास करून जावे लागते. एन्झीम नावाचे उपचार तिला घ्यावे लागतात त्यामुळे तिचे जगणे वाढते.