बालपण देगा देवा... एका दिवसाच्या शाळेत जा; जपानमध्ये पर्यटकांना मिळते लहानपणाची अनुभूती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 06:03 AM2024-12-11T06:03:22+5:302024-12-11T06:03:31+5:30
टाेक्याे : आपल्या मराठीत एक म्हण आहे, बालपण देगा देवा... बालपण आणि शाळेतल्या आठवणीत रमून पुन्हा एकदा ते दिवस ...
टाेक्याे : आपल्या मराठीत एक म्हण आहे, बालपण देगा देवा... बालपण आणि शाळेतल्या आठवणीत रमून पुन्हा एकदा ते दिवस जगता यावे, असे प्रत्येकालाच वाटते. तर, शाळेतले दिवस अनुभवण्याची संधी जपानमध्ये मिळत आहे. पर्यटाकंसाठी एका कंपनीने एक याेजना सुरू केली आहे. ‘युअर हायस्कूल’, असे त्याचे नाव आहे. त्यात पर्यटकांना एका दिवसासाठी उच्च माध्यमिक शाळेत शिकण्याची संधी दिली जाते. शाळेतल्या दिवसांच्या आठवणींनी आजही अनेकांना गहिवरुन येते. अशीच अनुभूती पर्यटकांना मिळणार आहे. त्यासाठी चिबा प्रांतात एका बंद पडलेलया शाळेला नवे स्वरुप देण्यात आले आहे.
शाळेत काय शिकवितात?
nया विद्यार्थ्यांना शाळेत काय शिकवितात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, शाळेत विद्यार्थ्यांना अनेक गाेष्टी शिकविण्यात येतात. कदाचित त्या अनेकांना माहिती नसतील.
nभूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत आत्मसंरक्षण कसे करावे, याचे धडे दिले जातात.
nजपानचा पारंपरिक पाेषाख किमाेनाे परिधान करण्याची संधी पर्यटकांना मिळते.
nजेवणानंतर इतिहास व पीटीचे वर्ग घेण्यात येतात. त्यात काही खेळ खेळविण्यात येतात.
nस्वच्छतेचा धडा देण्यात येताे. जपानच्या विद्यार्थ्यांना हे आवर्जून शिकवण्यात येते. त्यामुळे पर्यटकांनाही हा धडा देण्यात येताे.
एका दिवसाच्या शाळेसाठी खर्च किती?
काेणत्याही वयाच्या पर्यटकाला ३० हजार येन म्हणजे सुमारे १७ हजार रुपये माेजून एका दिवसाचा विद्यार्थी बनता येईल. एका दिवसात ३० जणांना शाळेत प्रवेश देण्यात येताे. या शाळेत काही बदमाश विद्यार्थीही येतात, जे त्रासही देतात.
गणवेश, शिक्षक आहेत खास
विद्यार्थ्यांना आवडीनुसार नाविक किंवा सिस्टरचा गणवेश निवडता येताे. त्यांना विविध वर्गात बसविण्यात येते.
विद्यार्थ्यांना याठिकाणी जपानी कॅलिग्राफीदेखील शिकविण्यात येते. हे धडे इंग्रजीतून देण्यात येतात. येथील एक शिक्षक हिदेओ ओनिशिमा हे एकेकाळी गुन्हेगार हाेते. मात्र, गुरुंच्या भेटीनंतर ते शिक्षक बनले.