Monkey B Virus: चीनमध्ये आढळला नवा व्हायरस, नोंदवला गेला पहिला मृत्यू; जाणून घ्या खतरनाक व्हायरसची लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 08:58 PM2021-07-19T20:58:39+5:302021-07-19T20:59:14+5:30

Monkey B Virus चीननंही या व्हायरसच्या संक्रमणाचे वृत्त मान्य केले आहे. चीननं या व्हायरसला Monkey B Virus असे नाव दिले आहे.

China reports first human death from Monkey B Virus. All you need to know | Monkey B Virus: चीनमध्ये आढळला नवा व्हायरस, नोंदवला गेला पहिला मृत्यू; जाणून घ्या खतरनाक व्हायरसची लक्षणं!

Monkey B Virus: चीनमध्ये आढळला नवा व्हायरस, नोंदवला गेला पहिला मृत्यू; जाणून घ्या खतरनाक व्हायरसची लक्षणं!

googlenewsNext

बीजिंग - जगभरात डेल्टा व्हेरिएंट व्हायरनं थैमान माजवला असताना चीनमध्ये Monkey B Virus या नव्या व्हायरसमुळे एका व्यक्तिचं निधन झाल्यानं खळबळ माजली आहे. माकडांतून हा व्हायरस पसरला जात असल्याचा दावा ग्लोबल टाईम्सनं केला आहे. चीननंही या व्हायरसच्या संक्रमणाचे वृत्त मान्य केले आहे. चीननं या व्हायरसला Monkey B Virus असे नाव दिले आहे. आधीच कोरोना व्हायरससाठी चीनला जबाबदार धरले जात आहे आणि त्यात या नव्या व्हायरसनं जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. मार्च २०२१मध्ये या व्हायरसमुळे दोन माकडांच्या मृत्यूची नोंद झाली होती, पण आता या व्हायरसमुळे माणसाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली व्यक्ती ही पशुवैद्यकीय सर्जन होती. ( China reports first human death from Monkey B Virus. All you need to know) 

Monkey B virus हा प्रथमच आढळलेला नसल्याचा दावाही अनेकांनी केला आहे. Monkey B virus हा आधीपासून अस्तित्वात आहे, परंतु माणसाला याची लागण होण्याची अन् त्यामुळे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. माकडांमुळे या व्हायरसचा प्रसार होत आहे. माकडांची थुंकी, विष्ठा, लघवी, मेंदू आणि पाठीच्या कण्यात या व्हायरसचे अस्तित्व सापडते. माणसांच्या central nervous symptomsवर हा व्हायरस हल्ला करतो, असे US National Library of Medicineचे म्हणणे आहे. या व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या लोकांचा मृत्यूदर हा ७० ते ८० टक्के आहे. म्हणजेच जर १०० लोकांना याची लागण झाली, तर त्यापैकी ७० ते ८० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. 

कोरोना व्हायरससारखीच याचीही लक्षणं आहेत. ताप येणं, अंगदुखी, थंडी वाजणे, थकवा जाणवणे आणि डोकं दुखणं ही Monkey B virusनं संक्रमित व्यक्तित आढळलेली लक्षणं आहेत. याहीपुढे Monkey B virusमुळे व्यक्तीच्या मेंदू व पाठीच्या कण्यावर सूजही येऊ शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला मेंदू संबंधित गंभीर आजार होऊ शकतात आणि त्याचा मृत्यूही होऊ शकतो.

संक्रमित माकडाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिला या व्हायरसची लागण होऊ शकते, असा दावा China CDC Weekly journalने केला आहे. पण, व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या व्हायरसचा फैलाव होण्याची भीती फार कमी आहे. पशुवैद्य, पशुंसाठी काम करणारे कर्मचारी आणि प्रयोगशाळेतील कामगार यांना या व्हायरसपासून अधिक धोका आहे. ( Chinese vet, 53, dies of deadly Monkey B virus after catching killer disease in lab) 

इतिहास काय सांगतो... 
१९३२ साली हा व्हायरस सर्वात आधी आढळला होता.  US CDCच्या वृत्तानुसार त्यानंतर ५० व्यक्तींना त्याची लागण झाली आणि त्यापैकी २१ जणांचा मृत्यू झाला. १९९७साली या व्हायरसमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची अखेरची नोंद होती. त्यानंतर आता चीनमध्ये हा व्हायरस सापडला आहे.  

 

Web Title: China reports first human death from Monkey B Virus. All you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.