पाकिस्तानच्या मदतीला धावला चीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 05:51 AM2018-01-03T05:51:49+5:302018-01-03T05:52:01+5:30
दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानचे जे उल्लेखनीय योगदान आहे, ते जागतिक समुदायाने ओळखायला हवे, असे मत व्यक्त करत पाकिस्तानच्या मदतीला चीन धावला आहे.
बीजिंग / इस्लामाबाद : दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानचे जे उल्लेखनीय योगदान आहे, ते जागतिक समुदायाने ओळखायला हवे, असे मत व्यक्त करत पाकिस्तानच्या मदतीला चीन धावला आहे.
गत १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरहून अधिक मदत करण्याचा मूर्खपणा केला आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारल्यानंतर याचे पडसाद उमटू लागले आहेत. चीनने म्हटले आहे की, पाकिस्तानने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत खूप प्रयत्न केले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने याची दखल घ्यावी. चीन आणि पाकिस्तान चांगले सहकारी आहेत. ते संबंध आम्ही अधिक मजबूत करू इच्छितो. (वृत्तसंस्था)
अमेरिकेच्या मदत थांबविण्याच्या धमकीनंतरही पाकिस्तान काळजी करताना दिसत नाही. कारण २०१० नंतर अमेरिकेकडून होणारी ही मदत खूपच कमी होत गेली आहे.