आता 'या' गरीब देशावर चीनचा डोळा, 'पामीर'च्या पहाडांवरच केला दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 11:53 AM2020-08-07T11:53:02+5:302020-08-07T12:01:22+5:30

चिनी इतिहासकाराने म्हटले आहे, की चिनी राज्‍याच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम आपल्याला आपण गमावलेली भूमी परत मिळवावी लागेल. काही भूभाग अपण परत मिळवला आहे. तर काही अद्यापही शेजारील देशांच्या ताब्यात आहे.

china threatens tajikistan and claims pamir mountains | आता 'या' गरीब देशावर चीनचा डोळा, 'पामीर'च्या पहाडांवरच केला दावा!

आता 'या' गरीब देशावर चीनचा डोळा, 'पामीर'च्या पहाडांवरच केला दावा!

Next
ठळक मुद्देआता मध्‍य-आशियातही घुसण्याची तयारी करतोय चीन.चीनच्या अधिकृत माध्यमाने आता तजाकिस्‍तानच्या 'पामीर' पहाडांवरच दावा सांगायला सुरुवात केली आहे. चीनच्या सरकारी माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या या लेखामुळे तजाकिस्‍तानमधील अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

पेइचिंग -लडाख आणि दक्षिण चीन समुद्रातील शेजारील देशांच्या भूभागावर कब्‍जा करण्याच्या तयारीत असलेला चीन, आता मध्‍य-आशियातही घुसण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या अधिकृत माध्यमाने आता तजाकिस्‍तानच्या 'पामीर' पहाडांवरच दावा सांगायला सुरुवात केली आहे. यामुळे मध्य-आशियातील या अत्यंत गरीब देशाची चिंता वाढली आहे. चीन आणि तजाकिस्‍तानने 2010 मध्ये एका करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत त्यांना पामीर भागाचा 1 हजार 158 किलो मीटर एवढा प्रचंड भू-भाग नाईलाजास्तव चीनला द्यावा लागला होता.

चिनी इतिहासकार चो याओ लू यांनी चीनमधील काही माहितीच्या आधारे दावा केला आहे, की पामीरचा संपूर्ण भाग त्यांचाच आहे आणि चीनने तो परत मिळवायला हवा. चीनच्या सरकारी माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या या लेखामुळे तजाकिस्‍तानमधील अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. चीनच्या या दाव्यानंतर आता रशियाचेही लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे. कारण, रशिया मध्‍य-आशियातील देशांना रणनीतीच्या दृष्टीने आपला भाग मानतो.

एकट्या तजाकिस्‍तानातच सोन्याचे 145 भांडार -
चीन तजाकिस्‍तान आणि अफगानिस्‍तानच्या सीमेवर ताशकुर्गानजवळ एक एअरपोर्ट तयार करत आहे. यामुळे दुशांबेची चिंता अधिक वाढली आहे. चिनी इतिहासकाराने म्हटले आहे, की चिनी राज्‍याच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम आपल्याला आपण गमावलेली भूमी परत मिळवावी लागेल. काही भूभाग अपण परत मिळवला आहे. तर काही अद्यापही शेजारील देशांच्या ताब्यात आहे. यांपैकी पामीरही एक प्राचीन भाग आहे. जो 128 वर्षांपासून जागाच्या दबावामुळे आपल्यापासून वेगळा आहे.

याशिवाय चीन सरकार सोन्याच्या भांडारांसंदर्भातही तजाकिस्‍तान सरकारसोबत चर्चा करत आहे. चिनी वृत्तांनुसार, तजाकिस्‍तानातच जवळपास 145 सोन्याचे भांडार आहेत. तजाकिस्‍तान सरकारने चिनी कंपन्यांना या खानींना विकस‍ित करन्याचा आणि खोदकाम करण्याचाही अधिकार दिला आहे. जे अधिकारी आता या तणावावर लक्ष देऊन आहेत. ते म्हणतात, चीनची ही जुनीच खेळी आहे, ते रस्ते आणि एअरपोर्टच्या माध्यमाने तजाकिस्‍तानच्या बाजूला अधिक जमिनीवर दावा करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या -

झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे

Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

Web Title: china threatens tajikistan and claims pamir mountains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.