कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 03:10 PM2024-12-01T15:10:14+5:302024-12-01T15:10:39+5:30

कोरोना काळापासून चीन एका मोठ्या बंपर लॉटरीच्या शोधात होता. जगाची फॅक्टरी अशी ओळख असलेल्या चीनला अमेरिका ट्रेड वॉर सुरु करून अडवत होता.

China was on the trail of big jackpot since Corona; Now the treasure of 1000 metric tons is in hand of gold mines | कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 

कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 

जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. यामुळे अमेरिकेच्या टेंशनमध्ये वाढ झाली असून सुस्त पडलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. यामुळे मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या स्वप्नांनादेखील सुरुंग लागणार आहे. 

कोरोना काळापासून चीन एका मोठ्या बंपर लॉटरीच्या शोधात होता. जगाची फॅक्टरी अशी ओळख असलेल्या चीनला अमेरिका ट्रेड वॉर सुरु करून अडवत होता. भारतानेही चिनी कंपन्यांवर अनेक बंधने घातली होती. यामुळे चीनच्या नाड्या आवळल्या जात होत्या. अशातच चीनच्या हाती मोठा खजिना लागला आहे. 

चीनच्या हुनान प्रांतात हे सोने सापडले आहे. १००० मेट्रीक टन एवढा मोठा साठा असल्याचा अंदाज आहे. याचे बाजारातील मुल्य हे ८३ अब्ज डॉलर एवढे आहे. चीन आधीच सोन्याच्या बाजारात मोठा उत्पादक आहे, आता तर त्याला मोठा बुस्टच मिळाला आहे. २०२३ मध्ये जगाच्या जवळपास १० टक्के सोने हे चीनचे होते. आपल्या आरबीआयकडेच ८५० मेट्रीक टन सोने आहे, याच्या तुलनेत चीनच्या हाती किती मोठे भांडार लागले आहे, याची गणती केली जाऊ शकते. 

आजही ज्या देशाकडे जेवढे जास्त सोने त्याला तेवढा जास्त ताकदवर मानले जाते. अमेरिकेकडे ८१३३ मेट्रीक टन एवढे सोने रिझर्व्ह आहे, तर ३३१५ मेट्रीक टन सोन्याच्या साठवणुकीने जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत चीन सहाव्या आणि भारत देश नवव्या स्थानावर आहे. 

जेव्हा चलन आंतरराष्ट्री स्तरावर घसरते तेव्हा सोनेच खरेदी-विक्रीचे महत्वाचे साधन बनते. सोन्याचा वापर करून आर्थिक संकटात असलेले देश हे व्यवहार करतात आणि संकटातून बाहेर येतात. १९९१ मध्ये भारतानेही सोन्याच्या मदतीने आर्थिक संकटावर मात केली होती. 

Web Title: China was on the trail of big jackpot since Corona; Now the treasure of 1000 metric tons is in hand of gold mines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.