'चीनला महामारीची मोठी किंमत भोगावी लागेल, कोरोनाला चीनच जबाबदार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 08:16 AM2020-10-08T08:16:52+5:302020-10-08T08:17:22+5:30

जगातील सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये अमेरिका अग्रस्थानी असून लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

China will have to pay a heavy price for the corona, Trump warned by video on twitter | 'चीनला महामारीची मोठी किंमत भोगावी लागेल, कोरोनाला चीनच जबाबदार'

'चीनला महामारीची मोठी किंमत भोगावी लागेल, कोरोनाला चीनच जबाबदार'

Next
ठळक मुद्देजगातील सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये अमेरिका अग्रस्थानी असून लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाता कोरोनाबद्दल मत व्यक्त करताना चीनला इशारा दिलाय. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असून ते अद्यापही पूर्ण पणे बरे झालेले नाहीत. मात्र, अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा परतले आहेत. त्यानंतर, देशाल संबोधित करताना, ट्रम्प यांनी कोरोना महामारीला चीनच जबाबदार असल्याचे म्हटले. तसेच, चीनला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय. 

जगातील सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये अमेरिका अग्रस्थानी असून लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळेच, ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित करताना चीनला इशारा दिला. कोरोना महामारीला ना तुम्ही, ना मी जबाबदार आहे. जे घडलं, त्याला चीनच जबाबदार आहे. चीनमुळेच जगाला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. मात्र, चीनला याची मोठी किंमत भोगावी लागेल. कोरोनाच्या परिस्थितीमुळे तुम्हाला त्रास होतोयं, याचा तुमची काहीही चूक नाही. त्यामुळे, मला देशाला कोरोनामुक्त करायचं आहे, याची किंमत तुम्हाला भोगावी लागू नये, असे म्हणत अमेरिकेच्या नागरिकांना ट्रम्प यांनी धीर दिला. तसेच, मला झालेला कोरोना म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे, कारण कोरोनामुळे मला बरंच काही शिकायला मिळालं. रोगोवरील उपचारासाठीच्या संभाव्य औषधांबाबत मला शिकता आले, असेही ट्रम्प यांनी ट्विटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.  

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावरील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच "माझी तब्येत आता उत्तम आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसला तुमच्या जीवनावर वरचढ होऊ देऊ नका" असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प अद्यापही कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आता व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार ट्रम्प हे संध्याकाळी 6 वाजता वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमधून पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. पण ट्रम्प अद्यापही कोरोनातून पूर्णपणे बरे झाले नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र तब्येतीत काही सुधारणांमुळे त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

फेसबुकने कोरोनाची पोस्ट केली डिलीट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देखील एक पोस्ट फेसबुकने आता डिलीट केली आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवर ट्विटर आणि फेसबुक या दोघांनीही अ‍ॅक्शन घेतली आहे. फेसबुकने ट्रम्प यांची कोरोना व्हायरससंबंधीची एक पोस्ट डिलीट केल्याची माहिती मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये कोरोना व्हायरस हा फ्लू सारखाच असल्याचा दावा केल्याची माहिती आहे. फेसबुकने ही पोस्ट हटवली असली तरी त्याआधी तब्बल 26,000 हून अधिक वेळा ती शेअर केली गेली आहे. फेसबुकच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनासारख्या गंभीर आजाराबाबत चुकीची माहिती देणारी पोस्ट आम्ही हटवली आहे. यासोबतच ट्विटरने देखील त्यांच्या एका पोस्टवर वॉर्निंग लेबल लावलं आहे. कोरोना संदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असेल अथवा एखाद्या नियमांचं उल्लंघन केलं जात असेल तर ते वॉर्निंग लेबलवरून सांगितलं जातं. 

सोशल मीडियानं घेतली अ‍ॅक्शन

अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक झाली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2019-20 मध्ये अमेरिकेत फ्लूमुळे 22,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत याआधीही असं झालं आहे. ऑगस्टमध्ये फेसबुकने कोरोना संदर्भातील ट्रम्प यांची एक पोस्ट हटवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोस्ट हटवून सोशल मीडियाने अ‍ॅक्शन घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: China will have to pay a heavy price for the corona, Trump warned by video on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.