मोठा खुलासा! भविष्यातील युद्धांसाठी 30 वर्षांपासून 'या' सिक्रेट प्रोजेक्टवर काम करत आहे चीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 12:41 PM2021-07-09T12:41:08+5:302021-07-09T12:47:27+5:30

Secret Unmanned Drone Submarines: समुद्रात आपला दबदबा वाढवण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत

china is working on Secret Unmanned Drone Submarines project since 30 years | मोठा खुलासा! भविष्यातील युद्धांसाठी 30 वर्षांपासून 'या' सिक्रेट प्रोजेक्टवर काम करत आहे चीन

मोठा खुलासा! भविष्यातील युद्धांसाठी 30 वर्षांपासून 'या' सिक्रेट प्रोजेक्टवर काम करत आहे चीन

Next
ठळक मुद्देचीनी सैन्य या सीक्रेट मानव रहित ड्रोन सबमरीन प्रोग्रामला फंडिंग करत आहे

नवी दिल्ली:मागील अनेक दिवसांपासून भारत आणि चीनदरम्यान वाद सुरू आहे. यातच आता एक मोठा खुलासा झाला आहे. चीन मागील 30 वर्षांपासून सीक्रेट मानव रहित ड्रोन सबमरीन (Secret Unmanned Drone Submarines) तयार करत आहे. एका चीनी रिसर्च टीमने अंडरवाटर ड्रोनचे अनावरण केले. ही ड्रोन सबमरीन पूर्णपणे मानव रहित असून, कमांड सेंटरमधी आदेशावरुन शत्रुची पाणबुडी ओळखून नष्ट करण्यास सक्षम आहे.

चीनच्या सैन्याकडून मिळतील फंडिंग
साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनमधील सर्वात मोठी सबमरीन रिसर्च इंस्टीट्यूट हार्बीन इंजीनियरिंग यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक लियांग गुओलोंग (Professor Liang Guolong) ने सांगितले की, 'चीनी सैन्य या सीक्रेट मानव रहित ड्रोन सबमरीन (Unmanned Drone Submarine) प्रोग्रामला फंडिंग करत आहे. या सीक्रेट मानव रहित ड्रोन पाणबुड्यांना(Unmanned Drone Submarine) समुद्राच्या तळाशी सोडले जाईल आणि जेव्हा गरज असेल तेव्हा हल्ला करण्यासठी अॅक्टीव्ह केले जाईल. या पाणबुड्यांना चालवण्यासाठी जवानांची गरज नसेल. शत्रुला काही कळाच्या आत या ड्रोन सबमरीन त्यांच्या जहाज आणि पाणबुड्यांवर हल्ला करू शकतात. '

कशी असेल ड्रोन सबमरीन
लियांग गुओलोंग (Professor Liang Guolong) ने सांगितल्यानुसार, 'मानवरहित ड्रोन सबमरीन (Unmanned Drone Submarine) चालवण्यासाठी कुणाचीही गरज नसेल. कमांड सेंटरमध्ये बसलेला अधिकारी या समबरीनला आदेश देऊन शत्रुंवर हल्ला करू शकतो. यात जवानांच्या जीवालाही धोका नसेल. भविष्यात समुद्रात होणाऱ्या युद्धांमध्ये या सबमरीनचा वापर केला जाऊ शकतो.'

Web Title: china is working on Secret Unmanned Drone Submarines project since 30 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.