वॉशिंग्टन : अमेरिकेचे अणू प्रकल्प व सौरशक्ती केंद्रातील गोपनीय माहिती, तसेच व्यापारी गुपिते यांची सायबर हॅकिंगद्वारे चोरी केल्याचा आरोप चीनच्या पाच वरिष्ठ लष्करी अधिकार्यांवर ठेवण्यात आला असून, यामुळे चीन संतापाने धुसफुसत आहे, तर अमेरिकेने सरकारसमर्थित सायबर चोरीचे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. अमेरिका व चीन हे जगातील पहिल्या क्रमांकाचे व्यापारी भागीदार आहेत. अमेरिकेचे अॅटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी या चिनी अधिकार्यांवर चोरीचा आरोप ठेवला आहे. वेस्टिंग हाऊस इलेक्ट्रिकसहित सहा अमेरिकन कंपन्यांची गोपनीय माहिती चोरल्याचा हा आरोप आहे.(वृत्तसंस्था) अमेरिकेच्या विधी खात्यातर्फे या अधिकार्यांची नावेही जाहीर करण्यात आली असून, ती वांग डांग, सन कैलांग, वेन शिन्हू, हुआंग झेन्ह्यू , गु चुन्हाई अशी आहेत. सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे प्रमुख सिनेटर कार्ल लेविन यांच्या मते व्यावसायिक क्षेत्रातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, या प्रकरणात चीन हा सर्वांत मोठा गुन्हेगार आहे, तर गुप्तचर प्रकरणातील स्थायी समितीचे प्रमुख माईक रॉजर्स व डच रॅपसबर्ग यांच्या मते या पाच व्यक्तींवर आरोप दाखल करून त्यांना न्यायाच्या कटघर्यापर्यंत आणणे हे फार मोठे पाऊल आहे. सायबर गुन्हे एवढ्यापुरते मर्यादित नाहीत, दररोज चीनच्या पीएलएचे हजारो हॅकर अमेरिकेची व्यापारासंदर्भातील गुपिते हॅक करत आहेत.
चिनी अधिकार्यांवर सायबर चोरीचा आरोप
By admin | Published: May 21, 2014 2:06 AM