पाक अणुशास्त्रज्ञ व अतिरेक्यांच्या संबंधांची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:46 AM2018-05-11T01:46:06+5:302018-05-11T01:46:06+5:30
पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ व दहशतवादी गट यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआयएला चिंता वाटत असून, या दोघांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे सीआयएच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती जिना हॅस्पेल यांनी सांगितले.
वॉशिंग्टन - पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ व दहशतवादी गट यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआयएला चिंता वाटत असून, या दोघांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे सीआयएच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती जिना हॅस्पेल यांनी सांगितले.
सीआयएच्या प्रमुखपदी जिना हॅस्पेल यांची नियुक्ती करण्याचा अमेरिकेन सरकारचा विचार आहे. तसे झाले तर सीआयएच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एखादी महिला विराजमान होईल. अमेरिकी सिनेटच्या गुप्तचर यंत्रणाविषयक समितीच्या बैठकीत हॅस्पेल यांनी भाग घेतला. या बैठकीत सिनेटर जॉन कॉर्निन म्हणाले की, पाकिस्तानला अणुतंत्रज्ञान मिळावे, यासाठी ओसामा बिन लादेन व अल कैदाच्या दहशतवाद्यांनी पाकच्या अणुशास्त्रज्ञांशी भेट घेतली होती. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर या भेटीगाठी झाल्या होत्या.