अफगाणिस्तानात कोरोनानं काय कहर केला असं शोधायला गेलं तर दिसतं एक हताश चित्र.सुदैवानं कोरोनाचा फार प्रादरुभाव अफगाणिस्तानात झालेला नाही. आजवर फक्त 22 लोक बाधीत आहेत.मात्र ही संख्या वाढली तर काय असा मोठा पेच तिथल्या सरकारसह वैद्यकीय व्यवस्थेसमोर उभा आहे.आधी युद्ध, मग तालिबान, 18 वर्षे हा देश पिचला. सगळी नागरी व्यवस्था मोडीत निघाली. भय आणि दहशत हेच आयुष्य.आता कुठं अमेरिका-तालिबान करार झाला. त्यातून अगदी धुसर का होईना आशा स्थानिकांना होती की गोष्टी वळणावर येतील. तालिबान आणि अफगाण नेतृत्व यांच्यात बोलणी सुरु होणार होती.मात्र ते सारं थांबलं. सारं जगही थांबलं. अमेरिकेला आता यासा:यासाठी वेळ नाही.दुसरीकडे अफगाणिस्तानाची सीमा एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे इराणला लागून आहे. दोन्हीकडे कोरोनाचा कहर आहेच. हेरत शहराजवळची इराण सीमा अफगाणिस्तानने बंद केली. पाकिस्तान सीमाही बंद केली.मात्र त्यानं प्रसार रोखेलच अशी अजूनही खात्री नाही.साध्या साध्या आजारांसाठी काबुल आणि अन्य शहरांत लोकांची दवाखान्यात गर्दी असते.काबूलमध्ये आजच्या घडीला असा एकच दवाखाना आहे जिथं कोरोनावर उपचार होऊ शकतात, व्हेंटिलेटरची सोय आहे. मात्र एकावेळी फक्त 15क् रुग्णांना दाखल करता येईल इतकीच त्या दवाखान्याची क्षमता आहे.इराणहून सीमाबंदीपूर्वी आलेल्या माणसांना बाजूला ठेवण्यात आलं असलं तरी पुढे काय हा प्रश्न आहेच.सरकार प्रचार करतं आहे की, स्वच्छता पाळा, वारंवार हात धुवा.मात्र काबुलस्थित स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. नजमुल्ला शेफाजो सांगतात, इथं डॉक्टरांना हात धुवायला स्वच्छ पाणी नाही. तिथं आपण काय हायजिनची चर्चा करणार? आम्ही डॉक्टर स्वत:ची पुरेशी काळजी घेऊ शकत नाहीत. तशी साधनं नाहीत. तर आम्ही रुग्णांना काय सांगणार, हात धुवा. त्यांच्याकडे पाणी-साबण नाही अशी अवस्था अनेकांची आहे.याकाळात अफगाणिस्तानमध्ये रस्ते, इमारती, स्टेडियम बांधण्याची कामं सुरु आहेत. सरकारने कॉण्ट्रॅक्टर्सना सांगितलं की, मजुरांची काळजी घ्या. त्यांना सॅनिटायझर द्या. तर 4क्क् मजुरांमागे एक सॅनिटायझरची बाटली असं वाटप करण्यात आलं.परिस्थिती अशी भिषण आहे की, लोक केवळ प्रार्थना करु शकतात की कोरोनानेच आपल्यावर दया दाखवत आपल्याकडे फिरकू नये.
coroanvirus : अफगाणिस्तानात डॉक्टरांचे हाल , रुग्णाचं काय होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 6:25 PM
हात धुवायला पाणी नाही आणि सॅनिटायझर कुठून आणायचं?
ठळक मुद्देलोक केवळ प्रार्थना करु शकतात...