वॉशिंग्टन - कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय योजना करत आहे. काही जण रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम अथवा योग करत आहेत. तर काही जण पारंपरीक आयोर्वेदिक काढे घेत आहेत. मात्र, असे असतानाच अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर आली आहे. येथे लोक एव्हरक्लेअर नावाचे ड्रिंक मोठ्या प्रमाणावर घरात साठवताना दिसत आहेत.
सध्या कोरोनामुळे कॅलिफोर्नियामध्ये या ड्रिंकची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एवढेच नाही, तर या ड्रिंकवर गाणेही तयार केले जात आहेत. काही दिवसांपर्वी या ड्रिंकची मागणी एवढी वाढली होती, की सरकारने 11 राज्यांमध्ये हिला अवैध घोषित केले होते. कोरोना काळात लोकांनी याचा वापर पिण्याबरोबरच, हँड सॅनिटायझर आणि इतर जंतूनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या औषधांना पर्याय म्हणूनही करायला सुरुवात केली होती.
कोरोना व्हायरसचा फैलाव सुरू झाल्यापासून सॅनिटायझरच्या वापरावर जोर दिला जात आहे. तेव्हापासूनच या ड्रिंकची मागणीही वाढली आहे. एवढेच नाही, तर एव्हरक्लेयरमध्ये अशा प्रकारचे जंतू मारण्याची शक्ती अधिक असल्याचेही समोर आले आहे. याचा वापर पिण्याबरोबरच जंतूनाशक म्हणूनही केला जाऊ शकतो. हे ड्रिंक फरशीवर टाकून फरशीही स्वच्च केली जाऊ शकते. डब्ल्यूएचओने अल्कोहोल युक्त सॅनिटायझर वापरायला सांगितले आहे. त्यासाठी एव्हरक्लेअर अगदी योग्य आहे. जे घटक सॅनिटायझरमध्ये असतात ते सर्व घटक यात आहेत. यामुळेच अधिकांश लोक याच्या बाटल्या विकत घेऊन त्याचा स्टॉक करत आहेत.
लॉस एंजल्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका आठवड्यात दुकानांवर एव्हरक्लेअरच्या फारतर दोन-तीन बाटल्याच विकल्या जात होत्या. मात्र, आता लोक त्या एक गठ्ठाच विकत घेत आहेत. विशेष म्हणजे एक वेळ तर अशीही आली होती, की दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर, एका व्यक्तीला दोनच बाटल्या मिळतील, असे लिहावे लागले होते. यानतंर या बाटल्यांच्या विक्रीला काही प्रमाणात आळा बसू शकला. लोक एव्हरक्लेअरचा वापर केवळ हात स्वच्छ करण्यासाठीच नाही, तर फळे, फरशी आणि घरातील इतर वस्तूदेखील सॅनिटाइझ करण्यासाठी करत असल्याचे समजते.
महत्त्वाच्या बातम्या -
सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन
धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा