रोम : इटलीमधील कोरोना व्हायरसचे वाढते संकट पाहता संपूर्ण देशाला लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे इटालियन लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यांनी स्वत:ला आपल्या घरात कैद करून घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील चर्चेत असणारी अश्लील वेबसाइट 'पॉर्न हब'ने 3 एप्रिलपर्यंत आपली प्रीमियम सेवा मोफत केली आहे.
गुरुवारी 'पॉर्न हब' कंपनीने यासंबंधीचे एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये 'पॉर्न हब'ने म्हटले आहे की, लॉक डाऊनच्या दिवसांत आपल्या मदतीसाठी संपूर्ण महिनाभर प्रीमियम सर्व्हिस मोफत असणार आहे. इटलीच्या लोकांना एक महिन्यापर्यंत काहीच पैसे द्यावे लागणार नाहीत. इतकेच नाही तर 'पॉर्न हब'ने आपल्या उत्पन्नातील एक हिस्सा कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देण्याचे घोषित केले आहे.
दरम्यान, या 'पॉर्न हब'ची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. तेव्हापासून जगातील सर्वांत मोठी हा पॉर्न वेबसाइट आहे. या वेबसाइटला दररोज 11.5 दशलक्ष लोक व्हिजिट करतात. इटली जगातील सर्वाधिक पॉर्न पाहिल्या जाणार्या देशांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर अमेरिका आहे. तर, जपान दुसर्या आणि ब्रिटन तिसर्या क्रमांकावर आहे.
चीनमधील कोरोनामुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.
जगभरात आतापर्यंत 4600 मृत्यू कोरोनाने जगभरात कमीतकमी 4,600 लोकांचा बळी घेतला आहे आणि सुमारे 1,25,293 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोना व्हायरसला सामोरे जाण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना घाबरू नका असं आवाहन केले आहे.