Coronavirus: संसर्गातून बरे करणाऱ्या दोघा डॉक्टरांवरून ब्रिटिश पंतप्रधानांनी ठेवले आपल्या मुलाचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 10:50 PM2020-05-04T22:50:25+5:302020-05-04T22:50:37+5:30

लंडन येथील सेंट थॉमस रुग्णालयाच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. निक प्राईस व श्वसनविकार विभागाचे प्रमुख निक हार्ट यांनी बोरिस जॉन्सन यांच्यावर उपचार केले होते

Coronavirus: British PM names son after two doctors | Coronavirus: संसर्गातून बरे करणाऱ्या दोघा डॉक्टरांवरून ब्रिटिश पंतप्रधानांनी ठेवले आपल्या मुलाचे नाव

Coronavirus: संसर्गातून बरे करणाऱ्या दोघा डॉक्टरांवरून ब्रिटिश पंतप्रधानांनी ठेवले आपल्या मुलाचे नाव

Next

लंडन : कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरे करणाºया दोन डॉक्टरांप्रती कृतज्ञता दर्शविण्यासाठी त्यांच्या नावावरून इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या नवजात मुलाचे नाव ठेवले आहे. पंतप्रधानांच्या या आगळ्यावेगळ्या कृतीमुळे हे डॉक्टर भारावून गेले आहेत.
बोरिस जॉन्सन यांची जीवनसाथी कॅरी सिमंड्स यांनी नुकताच एका गोड बाळाला जन्म दिला. बोरिस व कॅरी यांनी आपल्या या मुलाचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस असे ठेवले आहे. हे नाव म्हणजे इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर यशस्वी उपचार करणाºया डॉ. निक प्राईस, डॉ. निक हार्ट या दोन डॉक्टरांच्या नावाचा संगम आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर, बोरिस जॉन्सन यांना लंडन येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे अतिदक्षता विभागात हे दोन्ही डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. आपल्याला मृत्यूच्या मगरमिठीतून या डॉक्टरांनी सोडवून आणले, अशी बोरिस जॉन्सन यांची भावना आहे.

निरोगी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा
लंडन येथील सेंट थॉमस रुग्णालयाच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. निक प्राईस व श्वसनविकार विभागाचे प्रमुख निक हार्ट यांनी बोरिस जॉन्सन यांच्यावर उपचार केले होते. या दोन डॉक्टरांच्या नावांचा संगम बोरिस जॉन्सन यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवताना साधला आहे. बोरिस जॉन्सन यांच्या कुटुंबाला सदैव निरोगी व आनंदी आयुष्य लाभू दे अशा सदिच्छा या दोन डॉक्टरांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Coronavirus: British PM names son after two doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.