गेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. दरम्यान, अनेक देशांनी पुढे येत भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चीननंदेखील आता भारताला मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवत मदतीचा प्रस्ताव दिला आहे. भारतातील चीनचे राजदूत सुन वेईदोंग यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. चीन भारताबरोबर महासाथीच्या विरोधात सहकार्य मजबूत करण्यास आणि देशाला पाठबळ व सहकार्य देण्यासाठी तयार असल्याचं जिनपिंग यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कोरोनाच्या महासाथीविरोधात लढण्यासाठी चीन भारताला हवी ती मदत करण्यास तयार आहे. तसंच चीनमध्ये तयार करण्यात आलेली महासाथीच्या विरोधातील सामग्री जलदगतीनं भारताला पोहोचवली जात आहे, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी यांनी गुरुवारी म्हटलं होतं.
Coronavirus : चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना संदेश; कोरोनाविरोधातील लढाईत मदतीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 8:58 AM
गेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे रुग्णसंख्या. चीननं दिला भारताला मदतीचा प्रस्ताव.
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे रुग्णसंख्याचीननं दिला भारताला मदतीचा प्रस्ताव