बीजिंग – जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव होण्यामागं चीन जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. कोरोनाच्या उत्पतीपासूनच चीनवर खापर फोडलं जातंय. भलेही या आरोपाचा चीन नकार देत असला तरी चीनच्या वुहानमधूनच कोरोना व्हायरसची(Coronavirus) सुरुवात झाली. गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीनं जगासमोर मोठं संकट उभं केले आहे. लसीकरणानंतरही कोरोनाचं संक्रमण थांबवण्याचं चिन्हं दिसत नाही. डेल्टानंतर ओमायक्रॉन (omicron) लोकांमध्ये दहशत पसरवत आहे. चीनमध्ये अलीकडच्या दिवसात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यातच येत्या २ आठवड्यात चीनमध्ये विंटर ऑलिम्पिक होणार आहे. त्यावरुन आता लाजिरवाणा प्रकार समोर येत आहे.
बीजिंगमध्ये होणाऱ्या विंटर ऑलिम्पिकच्या आधी कोरोना टेस्ट करण्यासाठी खेळाडूंच्या प्रायव्हेट पार्टमधून सॅम्पल घेण्यात आले. मागील वर्षीही चीनच्या एनल स्वॅब टेस्ट वादात अडकलं होतं. आता ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या या वादग्रस्त कोरोना चाचणीमुळे चीन पुन्हा एकदा वादात अडकला आहे. ही टेस्ट वादग्रस्त आहे परंतु चीननुसार, ही कोरोना डिटेक्ट करण्याची सर्वात सुरक्षित आणि योग्य पद्धत असल्याचा दावा केला जात आहे.
कशी होते एनल टेस्ट?
कोरोनाची एनल टेस्ट वादात अडकली आहे. या चाचणीद्वारे संक्रमित व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टच्या ५ सेटींमीटर आतमध्ये टेस्टिंग किट घुसवली जाते. त्यानंतर ती फिरवली जाते. चाचणीपूर्वी स्वॅब किटला तोडलं जातं. पूर्वीही चीनमध्ये अशाप्रकारे टेस्टिंग होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर वाढणारा वाद पाहता चीनने त्यावर बंदी आणली. परंतु आता विंटर ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वी पुन्हा एकदा चीनने खेळाडूंची एनल टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमध्ये होणार विंटर ऑलिम्पिक
चीनमध्ये ४ फेब्रुवारीपासून विंटर ऑलिम्पिक सुरु होणार आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यावरुन चीनने सुरक्षेच्या दृष्टीने एनल टेस्ट करण्याचा निर्णय घेतलाय. चीन या ऑलिम्पिक स्पर्धेची सुरक्षित खातरजमा करुन स्वत:चं वर्चस्व गाजवण्याच्या तयारीत आहे. चीनने या स्पर्धेला सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्ण बीजिंगमध्ये लॉकडाऊन लावलं आहे. लोकांना गरजेच्या वस्तूही घेण्यासाठी बाहेर पडण्यास मज्जाव आहे. अशास्थितीत चीनकडून करण्यात येणाऱ्या टेस्टनं चीनची पुन्हा नाचक्की होत आहे.