बीजिंग - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. आतापर्यंत जगभरातील दोन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावासाठी सुरुवातीपासूनच चीनला जबाबदार धरण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना विषाणू आणि चीनबाबत आता अजून एक धक्कादायक गौप्यफोट झाला आहे.संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोविड-१९ विषाणूचा फैलाव सात वर्षांपूर्वीच २०१२ मध्ये चीनमधील एका खाणीत झाला होता. या खाणीत वटवाघुळांची विष्ठा साफ करणारे सहा कामगार निमोनियासारख्या विषाणूमुळे बाधित झाले होते. त्यानंतर त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला होता, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान, या घटनेचेही वुहानमधील लॅबशी कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे.तज्ज्ञांनी मिळवेल्या माहितीनुसार चीनमधील युन्नान प्रांतातील मोजियांग येथील खाणीत सहा कामगार अचानक आजारी पडले होते. हे कामगार खाणीतील वटवाघुळांची विष्ठा साफ करत असत. दरम्यान, या मजुरांवर उपचार करणारे डॉक्टर लू सू यांच्या निदर्शनास आले की, या रुग्णांना तीव्र ताप, सुका खोकला, हाता-पायाचे दुखणे आणि काही रुग्णांना डोकेदुखीचा त्रास होता. ही सर्व लक्षणे आता जगात पसरलेल्या कोविड-१९ ची आहेत. ही खाण वुहानपासून एक हजार किमी दूर आहे.
मात्र तरीही येथील लॅबचा या प्रकणारशी संबंध होता. विषाणूतज्ज्ञ जोनाथन लॅथम आणि मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट अॅलिसन विल्सन बायोसायन्स रिसॉर्स प्रोजेक्टवर कामत करत आहेत. दरम्यान, त्यांनी ली शू यांचे याबबतचे शोधनिबंध वाचले होते. यामध्ये जे पुरावे देण्यात आले आहेत. त्यानंतर ते या साथीला नव्याने समजून घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या मजुरांचे सॅम्पल टिश्शू वुहानमधील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते, आता तिथूनच हा विषाणू लीक झाला आहे, असा दावा जोनाथन यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी केलेल्या चर्चेत केला आहे. तसेच याच लॅबमध्ये वटवाघुळांच्या मार्फत हा विषाणू पसरल्याचा शोध लागला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव होऊ लागल्यापासूनच चीनमधील वुहान हे आरोपांच्या फेऱ्यात सापडले आहे. येथील प्राण्यांच्या बाजारातून हा विषाणू पसरल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वुहानमधील व्हारयलॉजी लॅबमधून हा विषाणू लीक झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. मात्र हा विषाणू लोकांमध्ये पसरल्यानंतर सापडला होता आधी नाही, असा दावा या लॅबमधील अधिकारी आणि संशोधकांनी केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी