वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्याचे प्रयोग सुरू असून त्यातील दोन लसींपैकी कोणतीतरी एक लस बनविण्यात नक्की यश येईल, अशी डोनाल्ड ट्रम्प सरकारला आशा आहे. त्यामुळे या दोन्ही लसींचे अमेरिकेने याआधीच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ठेवले आहे. या दोन लसींची नावे मात्र अमेरिकेने उघड केलेली नाहीत.या देशाच्या आरोग्य खात्यातील धोरणविषयक कक्षाचे उपप्रमुख पॉल मँगो यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लस लवकर शोधून काढण्यासाठी अमेरिका सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना आॅपरेशन व्रॅप स्पीड असे नाव देण्यात आले आहे. सध्या या देशात आठ लसींचे प्रयोग विविध टप्प्यांत पोहोचले आहेत. त्यातील कोणती लस परिणामकारक आहे हे सिद्ध झाल्यानंतर अमेरिकेचा अन्न व प्रशासन विभाग त्या लसीला मान्यता देईल. पण त्यातल्या दोन लसींच्या प्रयोगातील निष्कर्षांकडे अमेरिका सरकारचे सर्वाधिक लक्ष आहे.त्यातील एक लस नक्कीच परिणामकारक निघेल, अशी आशा असल्याने त्या दोन्ही लसींचे उत्पादन याआधीच त्या देशाने करून ठेवले आहे. जी लस परिणामकारक असल्याचे सिद्ध होईल, तिच्या त्वरित वितरणास या व्यवस्थेमुळे सुरुवात करता येईल. अमेरिकेत आणखी तीन लसींचे लवकरच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ठेवण्यात येईल.
coronavirus: अमेरिकेत प्रयोग पूर्ण होण्याआधीच २ लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 4:24 AM