Coronavirus : वुहानमधील निर्बंध उठविणार : चीन सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:08 PM2020-03-25T12:08:34+5:302020-03-25T12:13:36+5:30

जग लॉक डाऊनच्या दिशेने...

Coronavirus : left sanctions will on Wuhan city : China government's decision | Coronavirus : वुहानमधील निर्बंध उठविणार : चीन सरकारचा निर्णय

Coronavirus : वुहानमधील निर्बंध उठविणार : चीन सरकारचा निर्णय

Next
ठळक मुद्देयुरोप, अमेरिकेसह अशिया खंडातील अनेक देश वेगाने लॉक डाऊनकडे चीनमधील कोरोनाची साथ आटोक्यातवुहानमधे कोरोनाची साथ पसरल्याचे लक्षात आल्यानंतर जानेवारी महिन्याच्या मध्यावर शहर बंद

पुणे : कोरोनामुळे जगभर संचारबंदीची स्थिती आहे. कोरानाच्या साथीची सुरुवात चीनमधील ज्या वुहान शहरातून झाली ते शहरातील जनजीवन येत्या ८ एप्रिलपासून पूर्वपदावर येणार आहे. चीन सरकारनेच त्या बाबतची माहिती दिली. युरोप, अमेरिकेसह अशिया खंडातील अनेक देश वेगाने लॉक डाऊनकडे (संपूर्ण व्यवहार ठप्प) जात आहे. 
जगभरातील पावणेदोनशे देशांमधे कोरोनाचा प्रसार झाला असून, युरोप आणि अमेरिकेमधील स्थिती गंभीर बनली आहे. हुबेई प्रांतातील वुहानमधून कोरोनाचा प्रसार सुरु झाला. तेथे गेल्या आठवडाभरामधे केवळ एक नवीन रुग्ण आढळला आहे. संपूर्ण चीनमधे गेल्या चोवीस तासांमधे नवीन ७८ बाधित रुग्ण आढळले आहे. चीनमधील कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. 
वुहानमधे कोरोनाची साथ पसरल्याचे लक्षात आल्यानंतर जानेवारी महिन्याच्या मध्यावर शहर बंद करण्यात आले होते. येथील स्थिती सुधारत असल्याने शहरातील व्यवहार ८ एप्रिल पासून सुरु करण्यात येतील. तो पर्यंत वाहतुकीवर निर्बंध कायम असतील. चीनने वुहान शहराला हिरव्या यादीत स्थान दिले आहे. स्थानिक नागरिक त्या प्रांतामधे फिरु शकतील. त्यासाठी नागरिकांना स्थानिक प्रशासनाने दिलेले डिजिटल आरोग्य प्रमाणपत्र दाखवावे लागेल. मात्र, शळा, महाविद्यालये आणि संस्था मात्र बंदच ठेवण्यात येणार आहेत. तसेच, स्थानिक उत्पादन संस्था आणि व्यवहार सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चायना डेली या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. 
वुहान मधील आरोग्य अधिकाºयांनी ब्रिटनसह साथ रोगाच्या नियंत्रणासाठी झटणाऱ्या सर्व देशातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाºयांना दक्षता घेण्याची सूचना केली आहे. उपचार करताना योग्य तो पोषाख घालण्याची सूचना केली आहे. चीनने सुरुवातीला संपूर्ण सुरक्षा असलेला पोषाख न करताच उपचार केले होते. ते टाळण्याचे आवाहन चीनमधील मेडिकल अधिकाºयांनी केले आहेत.
--------------
जागतिक आरोग्य संघटना काय म्हणतेय
भारत, चीन आणि अमेरिकेसह वीस देशांचा समावेश असलेल्या जी-२० देशांना आरोग्य रक्षक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन वाढविण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. अमेरिकेतील नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावी अशी सूचना देखील केली आहे. अमेरिकेतील बाधितांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य सेवेवर ताण येत असल्याने गर्दी टाळण्याची सूचना त्यांनी केली आहे. 

 

Web Title: Coronavirus : left sanctions will on Wuhan city : China government's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.