CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! बकरी ईदनंतर कोरोना संसर्गात झाली मोठी वाढ; 'या' देशात 14 दिवसांचा लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 03:52 PM2021-07-26T15:52:27+5:302021-07-26T16:03:07+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: सरकारने ईद उल अजहानिमित्त कोरोना लॉकडाऊन निर्बंधामध्ये शिथिलता दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारने 14 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान काही देशांत पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येत आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये बकरी ईदनंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने देशभरात 14 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
देशात जर या वेगाने कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागल्यास रुग्णालयात उपचारासाठी जागा अपुरी पडण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशमध्ये कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. रविवारी कोरोनामुळे 228 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या 11 हजार 291 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बांगलादेश सरकारने ईद उल अजहानिमित्त कोरोना लॉकडाऊन निर्बंधामध्ये शिथिलता दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारने शुक्रवारी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाची लस घेतल्यानंतरही निष्काळजीपणा ठरू शकतो घातक; अशी घ्या काळजी#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/TgzQJtjR7l
— Lokmat (@MiLOKMAT) July 26, 2021
आरोग्य मंत्री जाहिद मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाग्रस्तांची संख्या अशाच प्रकारे वाढू लागल्यास रुग्णालयात उपचारासाठी जागा अपुरी पडण्याची भीती मलिक यांनी व्यक्त केली आहे. संसर्गावर नियंत्रण न मिळल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान होईल. त्यामुळे सर्वांनाच आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
Corona Vaccine : जगभरातील रुग्णांच्या संख्येने 19 कोटींचा टप्पा केला पार, लसीकरण मोहीम वेगाने सुरू#Corona#coronavirus#CoronaVirusUpdates#CoronaVaccine#CoronaVaccinationhttps://t.co/Qsrkvo6kxx
— Lokmat (@MiLOKMAT) July 26, 2021
बंगबंधू शेख मुजीब मेडिकल यूनिव्हर्सिटी फील्ड रुग्णालयामध्ये 1000 बेड आणि 200 आयसीयूची व्यवस्था करण्यात आली आहे. भारताने ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून बांगलादेशला 200 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पाठवला आहे. बांगलादेशमध्ये आतापर्यंत 19 हजार 274 जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर 11 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. लॉकडाऊनची घोषणा करतानाच सरकारने सर्व नागरिकांना घरातच राहा असं म्हटलं आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये कोर्ट, फॅक्ट्री, बाजार, उद्योग आणि ऑफिस बंद असेल असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! कोरोनावर मात केली पण आरोग्यविषयक समस्यांनी चिंता वाढवली#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/mHy87GLzNV
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2021