कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 245,947,200 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत जगभरातील कोरोना बळींची संख्या 49 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत 44,991,008 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा ल़ॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
रशियामध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना सुरू झाल्यापासून ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचं म्हटलं जात आहे. 1159 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या आठवड्यापासूनच कोरोनाचा जास्त कहर पाहायला मिळत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुतिन सरकारने 11 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
शाळा, कॉलेज, मॉल, रेस्टॉरंटसह बाजारपेठा बंद
रशियामध्ये गुरुवारी शाळा, कॉलेज, मॉल, रेस्टॉरंटसह बाजारपेठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेसह जिम, मनोरंजन स्थळ, स्टोर्स हे 11 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. याच दरम्यान रेस्टॉरंट आणि हॉटेल डिलिव्हरी ऑर्डरसाठी सुरू असणार आहे. लोकांना कार्यालये आणि सार्वजनिक सेवांपासून लांब ठेवल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल अशी अधिकाऱ्यांना आशा आहे. यामध्ये सरकारने औषधं आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
रशियामध्ये वेगाने लसीकरण सुरू
रशियामध्ये वेगाने लसीकरण सुरू असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाचा हाहकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतांच्या आकड्याने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसचं नवनवीन रुप समोर येत असल्याने धोका आणखी वाढला आहे. कोरोनावर लाखो लोकांनी मात केली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया आणि मेक्सिकोचा समावेश आहे. जगभरातील एकूण मृतांपैकी 50 टक्के मृत्यू याच देशांमध्ये झाले आहेत.