वॉशिंग्टन : जगातील अनेक देश कोरोनाचा सामना करण्यासाठी दक्षीण कोरियाने केलेल्या उपाय योजनांचा अवलंब करतील, अशी आशा संयुक्त राष्ट्रंचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यंनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात दक्षीण कोरियाला मोठे यश मिळाले आहे. आता ते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी योजना आखत आहेत.
गुटेरेस म्हणाले, दक्षीण कोरियाने नुकतीच एक महत्वकांक्षी 'हरित योजना' सादर केली आहे. यात कोळशावर चालणाऱ्या नव्या यंत्रांवर जेथे बंदी घालण्यात आली आहे, तेथे असलेल्या यंत्रांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यावरही यात उपाय योजना आहेत.
रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग
दक्षीण कोरियाप्रमाणे, कोरोनाचा समना करण्याबरोबरच हवामान बदलामुळे होणारे नुकसानही करमी करण्यावर विचार करावा लागेल. आपली अर्थव्यवस्था खुली करतानाच, पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही, अशी रोजगार निर्मिती करण्यावर जगातील देशांनी विचार करायला हवा. तसेच कमीत कमी कार्बन उत्सर्जन होईल याकडेही लक्ष द्यायला हवे.
दक्षीण कोरियातील संक्रमितांची संख्या 10,774वर -दक्षीण कोरियामध्ये शुक्रवारी केवळ 9 रुग्ण सापडले आहेत. आता येथील कोरोना रुग्णांची संख्या 10,774 झाली आहे. तर मृतांची संख्या 248 एवढी आहे. येथे फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला शेकडो कोरोनारुग्ण आढळत होते. मात्र, काही आठवड्यात ते अत्यंत कमी झाले आहेत. त्यामुळे आता येथे लॉकडाउनमध्येही काही सवलती देण्यात आल्या आहेत.
CoronaVirus News : आता कोरोनाची लढाई दुसऱ्या टप्प्यावर, गावा-गावात अन् घरा-घरात होणार तपासणी