CoronaVirus News: कोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 09:27 AM2020-05-06T09:27:26+5:302020-05-06T09:45:10+5:30

CoronaVirus marathi News and live updates: उंदरावंर लसीचे यशस्वी प्रयोग; मानवी शरीरावर परिणामकारक ठरण्याचा विश्वास

CoronaVirus marathi News Italy claims worlds first COVID 19 vaccine kkg | CoronaVirus News: कोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा

CoronaVirus News: कोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा

googlenewsNext

रोम: मानवी शरीरावर परिणामकारक लस शोधल्याचा इटलीनं केला आहे. रोमच्या स्पॅल्लानझनी रुग्णालयात लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या. काही उंदरांवर लसीचे प्रयोग करण्यात आले. लस टोचल्यानंतर उंदरांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या. या अँटीबॉडीज मानवी शरीरात परिणामकारक ठरू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. अरब न्यूजनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

इटलीमध्ये तयार करण्यात आलेली लसीची अतिशय प्रगत टप्प्यावर चाचणी सुरू असल्याची माहिती टॅकिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईगी ओरीसिच्चिओ यांनी दिली. टॅकिसकडून कोरोनाच्या लसीवर काम सुरू आहे. त्यांनी इटलीमधील एएनएसए वृत्तसंस्थेशी संवाद साधताना लसीची माहिती दिली. उन्हाळ्यानंतर या लसीची माणसांवर चाचणी सुरू होईल, असंदेखील ओरीसिच्चिओ म्हणाले. लोकमत डॉट कॉमनं या वृत्ताची पडताळणी केलेली नाही.

शास्त्रज्ञांनी उंदरांवर लसीचे प्रयोग केले. त्या उंदरांना एकदा लस टोचण्यात आली. मानवी शरीरात कोरोना विषाणूला रोखणाऱ्या अँटीबॉडीज उंदरांच्या शरीरात लसीकरणानंतर तयार झाल्या. पाच उंदरांवर आम्ही लसीची चाचणी घेतली. त्यांना लस टोचण्यात आल्यानंतर त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढली. या वाढलेल्या रोगप्रतिकारशक्तीचा कोरोना विषाणूवरील परिणामदेखील दिसून आला. दुसऱ्यांदा लस टोचल्यानंतर लसीचा आणखी चांगला प्रभाव दिसेल, असं टॅकिसमध्ये काम करणाऱ्या डॉ. इम्यॅन्युएल मॅरा यांनी सांगितलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं

"श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"

मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ

Web Title: CoronaVirus marathi News Italy claims worlds first COVID 19 vaccine kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.