मॉस्को :रशियामध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा रुग्णालयातील खिडकीतून अथवा छतावरून पडून मृत्यू होण्याची सलग तिसरी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या तीनही घटनांमध्ये एक साधर्म्य आहे. ते म्हणजे, या तीनही डॉक्टरांनी PPE आणि इतर मेडिकल इक्विपमेंट्स उपलब्ध नसल्याने पुतीन सरकारवर उघडपणे टीका केली होती.
डेली मेलने दिलेल्या एका वृत्तात म्हणण्यात आले आहे, की अलेक्झांडर शुलेपाव याच तिन्ही डॉक्टरांपैकी एक आहेत. यांनी एक व्हिडिओ तयार करून दावा केला होता, की ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असतानाही त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात आहे. अलेक्झांडरदेखील आपल्या रुग्णालयातील खिडकीतून पडले आणि आता मृत्यूशी झुंज देत आहेत. अलेक्झांडर यांनी दोन व्हिडिओ तयार केले होते. यात त्यांनी, कठीन परिस्थितीतही काम करण्यासाठी दबाव टाकला जात आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे, आसा आरोप केला होता. यानंतर वृत्त आले, की ते त्यांच्या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खिडकीतून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
आणखी वाचा - रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग
इतर दोन डॉक्टरांशीही असेच झाले -रशियातील इतर दोन डॉक्टरांसोबतही अशीच घटना घडली आहे. या दोन्ही डॉक्टरांनीही रुग्णालय प्रशासनावर आरोप केले होते. तसेच PPE, मास्क आणि हँड ग्लोव्हजची मागणी केली होती. यानंतर हे लोकही आपल्या रुग्णालयाच्या खिडकीतून पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, असे वृत्त आले होते. अलेक्झांडर यांचे वरिष्ठ कोस्यकिन यांनीही रुग्णालयात PPEच्या कमतरतेवर भाष्य केले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना फेक न्यूजच्या आरोपाखाली चौकशीसाठी बोलावले होते.
कोस्यकिन आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते, की 'अँब्यूलंस डॉक्टर्स अलेक्झांडर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. चीफ डॉक्टर अजूनही आमच्यावर काम करण्यासाठी दडपण आणत आहेत. अशा स्थित आम्ही काय करावे? आम्ही गेल्या काही महिन्यांपासून एकाच शिफ्टमध्ये सोबत काम करत आहोत. येथे अशीच परिस्थिती आहे, सर्वजण हे खोट असल्याचे सांगतील, मात्र, हेच सत्य आहे.' रुग्णालयाचे प्रमुख इगोर पोटानिन यानी सध्या यासंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आहे.
आणखी वाचा - CoronaVirus, LockdownNews: कोरोनाचा धस्का; 'या' देशातील लोक म्हणतायेत, लॉकडाउन हटवले तरी घराबाहेर पडणार नाही
अशाच प्रकारे 48 वर्षीय डॉक्टरचाही मृत्यू - अशाच प्रकारे एका प्रकरणात 48 वर्षीय डॉक्टर नतालिया लेबेदेवा यांचा मॉस्को येथील स्टार सिटी रुग्णालयाच्या एका खिडकीतून पडून मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केला होता, की त्यांनीही रुग्णालय प्रशासनाकडे PPE किटसंदर्भात तक्रार केली होती. याचप्रकारे एक 47 वर्षीय डॉक्टर, येलेना नेपोमिन्शीशाया क्रास्नोयार्क्स रुग्णालयाच्या 60 फूट उंच असलेल्या छतावरून पडल्या. त्याही सातत्याने PPE आणि इतर वैद्यकीय साहित्याची कमी असल्याची तक्रार करत होत्या, असे त्यांच्या सहकार्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आणखी वाचा - हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग