CoronaVirus Omicron Update:ओमायक्रॉन एकेक पाऊल पुढे सरकतोय; सौदीत सापडला पहिला रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 06:36 PM2021-12-01T18:36:06+5:302021-12-01T18:36:50+5:30
Corona New Variant Omicron: कोरोना व्हायरसचा हा आजवरचा सर्वात खतरनाक व्हेरिअंट असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिका, युरोपीय देश ब्रिटन, नेदरलँड, लॅटिन अमेरिकेसह 14 हून देशांमध्ये या व्हेरिअंटने हजेरी लावली आहे.
जगभरात खळबळ उडविलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने आता हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडलेले असताना आता सौदी अरेबियामध्ये देखील पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
सौदीने बुधवारी याची माहिती दिली आहे. सरकारी न्यूज एजन्सीने दक्षिण आफ्रिकेतून सौदीमध्ये दाखल झालेल्या प्रवाशाला कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झाल्याचे म्हटले आहे. ज्या व्यक्तीला या व्हेरिअंटची लागण झाली आहे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गल्फ देशांमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याचे सांगितले जात आहे. हा व्हायरस आतापर्यंत 14 देशांमध्ये पसरला आहे.
कोरोना व्हायरसचा हा आजवरचा सर्वात खतरनाक व्हेरिअंट असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिका, युरोपीय देश ब्रिटन, नेदरलँड, लॅटिन अमेरिकेसह 14 हून देशांमध्ये या व्हेरिअंटने हजेरी लावली आहे. यामुळे जगभरात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सावधानता बाळगण्यात येत आहे.
केंद्र सरकारने देखील धोकादायक देशांची सूची जारी आहे. या यादीत युरोपियन देश, ब्रिटेन, द आफ्रिका, ब्राजील, बोत्सवाना, चीन, मॉरीशस, न्यूजीलंड, झिंबाबे, सिंगापूर, हॉन्ग कॉन्ग आणि इस्त्रायल या देशांचा समावेश आहे. या देशांतून भारता येणाऱ्या सर्व प्रवाशांची दर चौथ्या आणि सातव्या व्या दिवशी आरटी-पीसीआर तपासणी होईल. निगेटिव्ह आली तरी त्या प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. तसेच भारतात येण्याआधी 48 तासांची आरटीपीसीआर टेस्ट गरजेची आहे.