ह्यूस्टन : अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूच्या साथीने पुन्हा डोके वर काढले असून, आता या आजाराने दक्षिण व पश्चिमेकडील राज्यांना ग्रासले आहे. राजकारणी तसेच निर्बंध पाळण्यात कुचराई करणारे नागरिक यांच्यामुळे ही साथ अधिकाधिक भागांत पसरत आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.अमेरिकेमध्ये बुधवारी एका दिवसात कोरोनाचे ३४ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका दिवसात कोरोनाचे ३६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले होते, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. याआधी कोरोनाने हाहाकार माजविलेल्या न्यूयॉर्क, न्यूजर्सी व अन्य राज्यांमध्ये या साथीचा जोर काहीसा ओसरला आहे. आता अॅरिझोना, कॅलिफोर्निया, मिसिसिपी, नेवाडा, टेक्सास, ओक्लाबोमा अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.ह्यूस्टन मेथडिस्ट हॉस्पिटल सिस्टिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मार्क बूम यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट आता दूर होत आहे असे वाटून लोकांनी निष्काळजीपणे वावरायला सुरूवात केली. त्यामुळे या साथीने आता पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत १ लाख २0 हजारांहून अधिक जण मरण पावले असून, २३ लाख लोकांना विषाणूची बाधा झाली आहे. देशात कोरोना बळींची संख्या आॅक्टोबरपर्यंत १ लाख ८० हजारावर पोचेल, असा विद्यापीठाचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)>न्यूयॉर्कसह तीन राज्यांतक्वारंटाइन बंधनकारकअमेरिकेत कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या राज्यांतून न्यूयॉर्क, कनेक्टिकट, न्यूजर्सी येथे येणाऱ्या प्रवाशांना१४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. तसा निर्णय या राज्यांनी घेतला आहे.न्यूयॉर्कच्या गव्हर्नरनी सांगितले की, प्रांतात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच इतर राज्यांतून येणाºया लोकांना क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे.
CoronaVirus: अमेरिकेत नवे ३४ हजारांवर रुग्ण, साथ पसरण्यास राजकारणी जबाबदार; वैद्यकीय तज्ज्ञांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 4:08 AM