रियाद - कोरोना व्हायरसच्या वेगाने पसरणाऱ्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सोशल डिस्टेसिंगसारखा पर्याय अवलंबत आहेत. याच दरम्यान सौदी अरेबियाने आणखी एक अनोखा पर्याय शोधून काढला आहे.
सौदीमध्ये आता थेट ड्रोनच्या मदतीने लोकांच्या तापमानाच्या तपासणी करण्यात येणार आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत लोकांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल किटचा वापर करण्यात येत होता. मात्र थर्मल किटद्वारे तापमान मोजताना कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होण्याचा धोका होता. पण आता सौदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचं काम देखील आणखी सोपं झाले आहे. ड्रोनद्वारे तापमान मोजण्यात येणार आहे. लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यावर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे रस्त्यांवर फिरणाऱ्या प्रत्येकाचं तापमान तपासणं हे ड्रोनद्वारे शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर उंटांचेही तापमान तपासण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर एका कुत्र्यालाही करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळेच सौदी अरेबिया कोणत्याच प्रकारची जोखीम स्वीकारण्यास तयार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 82,156 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,34,825 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,02,468 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : अनुकरणीय! 'या' केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबीयांनी गरजूंसाठी घरीच शिवले मास्क
Coronavirus : कोरोनाचे थैमान! न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात तब्बल 731 जणांचा मृत्यू
Coronavirus : संपूर्ण जगासाठी 'संजीवनी' ठरणारं हे औषधं नेमकं कोण कोण तयार करतंय?
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा
Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 82,156 जणांचा मृत्यू; इटली, स्पेनमध्ये परिस्थिती गंभीर
Coronavirus : बापरे! लॉकडाऊनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारुच्या बाटल्या अन्