coronavirus: अमेरिका, इंग्लंडची लस वर्षअखेरीपर्यंत येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:39 AM2020-08-30T06:39:14+5:302020-08-30T06:40:16+5:30

कोरोना प्रतिबंधक लस यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत किंवा त्याआधी जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार अमेरिका व इंग्लंड करत आहे.

coronavirus: US, England vaccine will be available by the end of the year | coronavirus: अमेरिका, इंग्लंडची लस वर्षअखेरीपर्यंत येणार

coronavirus: अमेरिका, इंग्लंडची लस वर्षअखेरीपर्यंत येणार

Next

वॉशिंग्टन : कोरोना प्रतिबंधक लस यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत किंवा त्याआधी जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार अमेरिकाइंग्लंड करत आहे.
अमेरिकेतील लस यंदा वर्षअखेर किंवा त्याच्याही आधी उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले होते. इंग्लंडमध्येही लस विकसित करण्यासाठी प्रयोग सुरू असून, ती लस परिणामकारक व सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्यास सार्वत्रिक वापरासाठी तिला तत्काळ मान्यता देण्यात येईल. त्यासाठी लसीच्या वापरासंदर्भातील कायदे बदलण्याचाही विचार करत आहे. इंग्लंडमध्ये येत्या आॅक्टोबर महिन्यातच लस जनतेच्या वापरासाठी उपलब्ध होईल.

लसीचे दुष्परिणाम दिसून आलेच तर कायद्यात केलेल्या बदलांमुळे उत्पादक कंपन्यांवर नुकसान भरपाईचे खटले कोणीही करू शकणार नाही. संशोधन करणाऱ्या कंपन्यांनी लस पुढील वर्षीच उपलब्ध होईल असेच आजवर जाहीर केले आहे.

ही लस बाजारात काही महिन्यांत उपलब्ध करून देऊ, असे सांगणारे डोनाल्ड ट्रम्प आता या वर्षाच्या अखेरीस किंवा त्याही आधी ही लस उपलब्ध होईल, असे म्हणू लागले आहेत. या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ती डोळ्यासमोर ठेवूनही डोनाल्ड ट्रम्प वक्तव्ये करीत आहेत. जनतेला अशा लसीची आशा दाखविल्यास ते आपल्याला पाठिंबा देतील, अशी ट्रम्प यांची अटकळ आहे.

कोरोना प्रतिबंधक लसींसंदर्भात जेवढे प्रयोग सुरू आहेत, त्यातील एक तरी लस परिणामकारक आहे हे सिद्ध झाल्यासच अमेरिका, इंग्लंडचे जनतेला लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याचे ध्येय प्रत्यक्षात येईल.

‘समन्यायी पद्धतीने वितरण करा’
अमेरिकेतील सेंटर्स आॅफ डिसिजेस कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसीपी) संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी म्हटले आहे की, जरी ही लस पुढच्या वर्षीपर्यंत तयार झाली तरी पहिले काही महिने याचा पुरवठा मर्यादित स्वरूपाचा असेल. या लसीचे वितरण समन्यायी पद्धतीने होणे आवश्यक आहे.

Web Title: coronavirus: US, England vaccine will be available by the end of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.