कोरोनापासून बचावासाठी लसीचे एकहून अधिक डोस घ्यावे लागतील!; बिल गेट्स यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 07:08 PM2020-07-23T19:08:17+5:302020-07-23T19:27:50+5:30

जगासाठी किमान 7 अब्ज डोस तयार करून ते वितरित करण्याची आवश्यकता असेल. पण..., बिल गेट्स यांनी या गोष्टींवरही केले भाष्य...

covid vaccine likely to work with multiple doses says bill gates | कोरोनापासून बचावासाठी लसीचे एकहून अधिक डोस घ्यावे लागतील!; बिल गेट्स यांचं मोठं विधान

कोरोनापासून बचावासाठी लसीचे एकहून अधिक डोस घ्यावे लागतील!; बिल गेट्स यांचं मोठं विधान

Next

सॅन फ्रान्सिस्को - सर्वसामान्यांसाठी अद्याप कोरोना लस आलेली नाही. मात्र, या लसीसंदर्भात तज्ज्ञ आणि दिग्‍गज मंडळींची विधानं यायला सुरुवात झाली आहे. यातच आता बिल गेट्स (Bill Gates) यांनी महत्वाचे आणि मोठे विधान केले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना कोरोना लसीचे एकपेक्षा अधिक डोस घ्यावे लागू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक गेट्स बुधवारी म्हणाले, सध्या तरी, अशी एकही लस दिसत नाही, जी एकाच डोसमध्ये परिणामकारक ठरेल. 

सध्या जगभरात 150 हून अधिक लसी तयार होण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. काही लसी तर तिसऱ्या टप्प्यातही पोहोचल्या आहेत. बील तथा मेलिंडा गेट्स फाउंडेशनने (Bill and Melinda Gates Foundation) कोविड-19 ची लस तयार करण्याच्या जागतीक प्रयत्नांत तब्बल तीस कोटी डॉलरचे आर्थ सहाय्य केले आहे. एक ब्लॉगमध्ये बील गेट्स म्हणाले होते, की या महामारीचा सामना करण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रभावी लस तत्काळ विकसित करण्याची आवश्यकता आहे.

बिल गेट्स म्हणाले, जगाच्या प्रत्येक भागात ही लस पोहोचावी यासाठी, या लसीचे अब्जावधी डोस तयार करणे आवश्यक आहे. हे काम लवकरात लवकर व्हायला हवे. तसेच, जगासाठी किमान 7 अब्ज डोस तयार करून ते वितरित करण्याची आवश्यकता असेल. मात्र, कोरोनाचा पराभव करण्यासाठी एकहून अधिक डोस द्यावे लागण्याच्या स्थितीत 14 अब्ज डोसची आवश्यकता भासेल, असेही गेट्स म्हणाले.

महाराष्ट्रात ऑक्सफर्डच्या लसीची मोठी चाचणी -
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाने तयार केलेल्या कोरोना लसीची चाचणी भारतात लवकरच सुरू होणार आहे. ही चाचणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. या लसीच्या मानवी चाचणीसाठी मुंबई आणि पुण्याच्या हॉटस्पॉट भागांतील तब्बल 4 ते 5 हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, सर्व काही व्यवस्थित राहिले, तर पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत लस लॉन्च करण्यात येईल, अशी आशा लसीचे स्थानीय उत्पादक सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) व्यक्त केली आहे. 

जगात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. सध्या जगभरात तब्बल 15,166,401 लोकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. तर एकूण 621,890 जमांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

युद्धाचे ढग! अमेरिकेनं दिला दूतावास बंद करण्याचा आदेश; चीनची पलटवार करण्याची धमकी 

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस

 

Web Title: covid vaccine likely to work with multiple doses says bill gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.