भारताविरोधात दहशतवाद्यांना पोसून पुरता कंगाल झालेल्या पाकिस्तानला बुडता बुडता आंतरराष्ट्रीय नाणे निधीने अखेरच्या क्षणी मदत देऊ केली आहे. यामुळे पाकिस्तानचे आजचे मरण उद्यावर गेले आहे. आयएमएफने पाकिस्तानला ३ अब्ज डॉलरच्या कर्जाला अंतिम मंजुरी दिली आहे.
आयएमएफच्या कार्यकारी मंडळाने बैठकीत हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानसाठी स्टँड बाय समझोत्याची समीक्षा केली. दोन्ही बाजुंमध्ये जूनमध्ये कर्मचारी स्तरावर सहमती मिळाली होती. आयएमएफ काही दिवसांत कर्जाचा पहिला हप्ता १.१ अब्ज डॉलर पाकिस्तानला देणार आहे. आजच्या बैठकीत जर पाकिस्तानला मदत मिळाली नसती तर पाकिस्तान दिवाळखोर झाला असता. कारण पाकिस्तानकडे परदेशांकडून घेतलेले कर्ज चुकविण्यासाठी पैसे नव्हते.
जूनमध्ये जाहीर झालेल्या याआधीच्या कार्यक्रमाला पाकिस्तानचे नाव नव्हते. IMF आता पाकिस्तानला पुढील हप्ता देणार नसल्याची चर्चा होती. २९ जून रोजी कार्यक्रम संपत होता. मात्र, याच्या एक दिवस आधी पाकिस्तान आणि IMF यांच्यात एक करार झाला होता. स्टँड बॉय फॅसिलिटीच्या माध्यमातून पाकिस्तानला $3 अब्ज कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला आज मंजुरी मिळाली.
पाकिस्तान सरकारला IMF कडून सुमारे 2.5 अब्ज डॉलर्सची अपेक्षा होती, परंतु त्यांना 3 अब्ज डॉलर्स देण्यात आले आहेत. पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून 2 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत मिळाल्याच्या एका दिवसानंतर आयएमएफची बैठक झाली आहे.