शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

इस्रायलकडून राखीव सैनिक तैनात

By admin | Published: August 01, 2014 12:01 AM

गाझापट्टीवरील आपल्या मोहिमेला गती देत इस्रायलने आणखी १६ हजार राखीव सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

गाझा/जेरूसलेम : गाझापट्टीवरील आपल्या मोहिमेला गती देत इस्रायलने आणखी १६ हजार राखीव सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हमासच्या अतिरेक्यांविरोधात गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या सैन्य अभियानाला आणखी गती देण्याच्या उद्देशाने इस्रायलने हा निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत गाझातील १,३६० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले.जागतिक पातळीवरून केले जाणारे संयम राखण्याचे आवाहन धुडकावून लावत इस्रायली सुरक्षा कॅबिनेटने ‘आॅपरेशन प्रोटेक्टिव एज’ कायम ठेवण्यास मंजुरी दिली. गेल्या ८ जुलैपासून हे अभियान सुरू आहे.नवीन सैन्यबल तैनातीमुळे या संघर्षात सहभागी इस्रायली सैनिकांची संख्या वाढून ८६ हजारावर गेली आहे. या संघर्षात जवळपास ५८ इस्रायली मारले गेले. यात ५६ सैनिक व दोन नागरिकांचा समावेश आहे. इस्रायलमध्ये काम करत असलेला थायलंडचा एक मजूरही यात मारला गेला.गाझापट्टीवरून हमास बंडखोरांतर्फे सुरू रॉकेट हल्ले रोखण्यासाठी ही मोहीम सुरू केल्याचा दावा इस्रायलद्वारे केला जात आहे; मात्र नंतर हमासचे इस्रायलमध्ये प्रवेश करण्यासाठी बोगदे नष्ट करण्यासाठी ही कारवाई सुरू ठेवण्यात आल्याचे इस्रायलद्वारे सांगण्यात आले.अभियान कायम ठेवतानाच इस्रायलने इजिप्तला एक शिष्टमंडळ पाठविले आहे. अमेरिकेशी हातमिळवणी करत इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षावर तोडगा काढण्याचा प्रयत्न इजिप्त करत आहे; मात्र यास अद्याप यश आले नाही.(वृत्तसंस्था)एका इस्रायली वृत्तसंकेतस्थळाने वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, अभियान पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ देण्याची गरज आहे. याकरता राखीव सैन्यबल तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. राखीव सैन्य कुठे आणि कशा पद्धतीने तैनात करावे, याबाबत गुरुवारी निर्णय घेतला जाईल. दरम्यान, इस्रायली सैन्याच्या हल्ल्यातील जीवितहानीमध्ये वाढ होत आहे. बुधवारी एका हल्ल्यात तीन सैनिक मारले गेले.दरम्यान, इस्रायलने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या गाझातील शाळेवरील हल्ल्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या हल्ल्यात कमीत कमी १६ जण मृत्युमुखी पडले होते. नि:शस्त्र नागरिकांना लक्ष्य केल्याने जागतिक पातळीवरून इस्रायलवर तीव्र टीका केली जात आहे. इस्रायलने चुकीने हा हल्ला झाल्याचा दावा करत याबद्दल माफी मागितली आहे. तिकडे संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव बान की मून यांनी शाळेवरील हल्ला ‘अयोग्य’ असल्याचे संबोधत याचा निषेध केला.