अमेरिकेने ज्याच्यावर ५० लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले, त्या हक्कानीला तालिबानने बनवले गृहमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 09:41 AM2021-09-08T09:41:43+5:302021-09-08T09:43:51+5:30

Sirajuddin Haqqani : दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचा मास्टरमाइंड सिराजुद्दीन हक्कानीचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्ससोबत (आयएसआय) सुद्धा संबंध आहेत. त्याला आयएसआयचा प्रॉक्सी देखील म्हटले जाते.

Designated global terrorist Sirajuddin Haqqani is interior minister in new Taliban govt led by Mullah Akhund  | अमेरिकेने ज्याच्यावर ५० लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले, त्या हक्कानीला तालिबानने बनवले गृहमंत्री

अमेरिकेने ज्याच्यावर ५० लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले, त्या हक्कानीला तालिबानने बनवले गृहमंत्री

Next

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी अखेर नवीन काळजीवाहू सरकारची घोषणा केली. तालिबानी संघटनेने अफगाणिस्तानचे पुढील पंतप्रधान म्हणून मुल्ला हसन अखुंद यांचे नाव घोषित केले आहे, तर मुल्ला अब्दुल गनी बरदार यांना त्यांचे डिप्युटी बनवले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अफगाणिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये गृहमंत्री बनवण्यात आले आहे. अमेरिकेने सिराजुद्दीन हक्कानी (Sirajuddin Haqqani) वर  ५ मिलीयन डॉलर्स  बक्षीस जाहीर केले आहे आणि आता तालिबानने त्याला नवीन सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी दिली आहे.

दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचा मास्टरमाइंड सिराजुद्दीन हक्कानीचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्ससोबत (आयएसआय) सुद्धा संबंध आहेत. त्याला आयएसआयचा प्रॉक्सी देखील म्हटले जाते. अलीकडेच, आयएसआयचे मुख्य महासंचालक लेफ्टनंट जनरल फैज हमीद अफगाणिस्तानला गेले होते आणि काबूलमधील सेरेना हॉटेलमध्ये थांबले होते. या भेटीनंतर पाकिस्तानला तालिबान सरकारमध्ये आपले स्थान मजबूत करायचे आहे, असे मानले जात होते.

फैज हमीद यांच्या भेटीनंतर तालिबानने त्यांच्या सरकारची घोषणा केली आणि सिराजुद्दीन हक्कानीला नवे गृहमंत्री केले. आता अफगाणिस्तानमध्ये लोकशाही मजबूत करण्यासाठी तालिबानच्या विरोधात काम करणाऱ्या अफगाण नागरिकांना घातक ठरू शकणाऱ्या डेटावर गृहमंत्रालयाचा हस्तक्षेप असेल. सिराजुद्दीन हक्कानीवर बक्षीस ठेवताना अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवाद्याचा दर्जा दिला आहे. 

सिराजुद्दीन हक्कानी हा सोव्हिएत विरोधी मुजाहिदीन कमांडर जलाउद्दीन हक्कानीचा मुलगा आहे. राजधानी काबूलमध्ये जानेवारी 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तो एफबीआयचा वॉन्टेड आहे. हॉटेलवर झालेल्या या स्फोटात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानेही त्याच्या अटकेसाठी पाच मिलियन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.

एवढेच नाही तर सिराजुद्दीन हक्कानी 2008 मध्ये अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या हत्येच्या प्रयत्नांच्या नियोजनात सहभागी असल्याचे म्हटले जाते. अनेक आत्मघातकी हल्ल्यांमध्ये त्याचा कथित सहभाग आणि अल-कायदाशी घनिष्ठ संबंध हे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेचे कारण आहे.

Web Title: Designated global terrorist Sirajuddin Haqqani is interior minister in new Taliban govt led by Mullah Akhund 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.