तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या मेजर जनरल कासीम सुलेमानी या लष्करी अधिकाऱ्याला ठार केले. या हल्लानंतर इराणने पुन्हा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला केला. त्यामुळे इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे.
इराणने अमेरिकी सैन्य कर्मचारी आणि संपत्तीवर हल्ला केला, तर इराणमधील 52 ठिकाणांना लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. मात्र, यानंतर काही वेळातच इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करण्यासाठी 80 मिलियन डॉलर बक्षीस देण्याचे घोषित केल्याचे आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तावरून समजते.
मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारवेळी एका संस्थेने इराणमधील सर्व नागरिकांनी एक डॉलर दान करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शिरच्छेद करण्यासाठी 80 मिलियन डॉलर इतकी रक्कम ही संस्था जमा करत आहे. यासाठी या संस्थेने इराणमधील सर्व नागरिकांना दान करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने जर प्रत्युत्तरात काही कारवाई केली, तर त्यांच्या 52 ठिकाणांवर हल्ले करण्यात येतील, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकी ड्रोन हल्ल्यात बगदादमध्ये जनरल सुलेमानी (62) मारले गेले. त्याचा बदला घेण्याचा संकल्प इराणने केला आहे. यामुळे या दोन देशांत तणाव वाढला आहे.
(इराणच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करू -ट्रम्प)
(अमेरिकेच्या हवाई तळावर मोठा हल्ला; ७ विमाने उडवली)
(इराण –अमेरिका तणावामुळे भारताची चिंता वाढली, परराष्ट्र मंत्र्यांकडून चर्चा)