Kash Patel: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे काश पटेल FBI चे नवे संचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 10:02 AM2024-12-01T10:02:22+5:302024-12-01T10:02:54+5:30

Kash Patel Donald Trump: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती केली. 

Donald Trump appointed Indian-American Kash Patel As New FBI Director | Kash Patel: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे काश पटेल FBI चे नवे संचालक

Kash Patel: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे काश पटेल FBI चे नवे संचालक

Kash Patel News: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे काश पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ट्रम्प यांनी काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. गुजराती असलेले काश पटेल हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (३० नोव्हेंबर) रात्री त्यांच्या सोशल मिडिया हॅण्डलवरून हा निर्णय जाहीर केला. 

काश पटेल यांच्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला हे जाहीर करताना अभिमान वाटत आहे की, कश्यप 'काश' पटेल केंद्रीय तपास यंत्रणेचे नवीन संचालक म्हणून काम करतील. काश एक चांगले वकील आहेत. तपास करणारे आणि अमेरिका फर्स्ट फायटर आहेत; ज्यांनी त्यांची कारकीर्द भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी, न्यायाची रक्षा करण्यासाठी आणि अमेरिकेच्या लोकांचे रक्षण करण्यात घालवली आहे."

"पटेल यांनी रशियाच्या डाव उघड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि सत्य, उत्तरदायित्व आणि संविधानाचे समर्थक म्हणून उभे राहिले आहेत", असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

कोण आहेत काश पटेल?

44 वर्षीय काश पटेल यांचे पूर्ण नाव कश्यप प्रमोद पटेल असे आहे. त्यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. त्यांचं कुटुंब मूळचे गुजरातमधील वडोदरा येथील आहे. त्यांचे कुटुंब पेशाने वकील आहे. काश पटेल यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय व्यक्तींपैकी एक समजले जाते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काश पटेल हे राष्ट्राध्यक्षांचे उप सहायक आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचे वरिष्ठ संचालक म्हणून कार्यरत होते. 

काश पटेल हे ख्रिस्तोफर रे यांची जागा घेतील. ख्रिस्तोफर रे यांना २०१७ मध्ये नियुक्त करण्यात आले होते. पण, नंतर त्यांची राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी पटलं नाही. एफबीआयच्या संचालकपदाचा कार्यकाळ १० वर्षांचा असतो. गेल्या अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यावर आणि एफबीआयवर जाहीरपणे टीका करत आहेत. 

Web Title: Donald Trump appointed Indian-American Kash Patel As New FBI Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.