अमेरिकेत 3 नोव्हेंबरला अध्यक्षीय पदासाठी निवडणुका होणार आहेत. तिथले दोन्ही राजकीय पक्ष भारतीय-अमेरिकन लोकांचे मन वळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक करताना दिसतायत. दुसरीकडे डेमोक्रॅट्स पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेनसुद्धा भारतीय वंशाच्या अमेरिकन जैन लोकांना त्यांच्या उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदींचा उल्लेख केला आहे. निवडणुकीच्या भाषणात त्यांनी भारतीय जनतेचे कौतुक केले आणि म्हणाले की, इथले लोक महान आहेत आणि त्यांनी एका नेत्याची निवड केली आहे. भारतीय जनता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या हुशार नेत्यांचे त्यांना समर्थन आहे.भारतीय-अमेरिकन मला मतदान करतील: ट्रम्पट्रम्प यांनी पीएम मोदी यांचे कौतुक केले आणि म्हटले की पीएम मोदी आमचे एक चांगले मित्र आहेत. ते खूप चांगले काम करत आहेत. ट्रम्प पुढे म्हणाले की, बहुतेक भारतीय-अमेरिकन लोक मला मतदान करतील.चिनी व्हायरसमुळे 188 देशांमध्ये विनाश झाला भारतीय-अमेरिकन लोकांना आमिष दाखविण्यासाठी ट्रम्प यांनी चीनवर हल्लाही केला. भारतीय प्रशांत क्षेत्रातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाचा उल्लेख करत त्यांनी भारताला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. या काळात त्यांनी पुन्हा चीनच्या आक्रमक वृत्तीवर हल्ला केला. ते म्हणाले की, यावेळी रशियापेक्षा चीनवर अधिक चर्चा झाली पाहिजे. कारण ते जे काम करत आहेत, ते खूप वाईट आहे. चिनी व्हायरसमुळे जगातील 188 देशांमध्ये हाहाकार माजला आहे. ते पुढे म्हणाले की, सध्या खूप वाईट परिस्थिती आहे आणि त्यासाठी आम्ही चीन आणि भारत यांना मदत करण्यास सदैव तत्पर आहोत. आम्ही या मुद्द्यांवर दोन्ही देशांशी बोलू. चीनची चतुराई संपूर्ण जग समजून घेत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी भारत आणि अमेरिकेतही अनेक निर्बंध लादले गेले होते. या निर्बंधांमुळे अमेरिका आणि भारत यांच्याबद्दल चीनचा रोष सातत्याने वाढत आहे. या रागामुळे चीन कधी पाकिस्तान आणि कधी नेपाळला चिथावत राहतो.
भारताकडे मोदींसारखा भारदस्त नेता, भारतीय-अमेरिकन मलाच मतदान करतील, ट्रम्पना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 8:44 AM