न्यूयॉर्क : फेसबुकने 2016 मध्ये अध्यक्षीय निवडणुकीवेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जोनाल्ड ट्रम्प यांना मोठी मदत केली होती. याचा खळबळजनक खुलासा फेसबुकच्याच उपाध्यक्षाने कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या मेमोमध्ये केला आहे. तसेच असेच सुरू राहिले तर ट्रम्प 2020 च्या निवडणुकीतही जिंकतील, असा इशाराही दिला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आधी रशियाचा हात असल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर फेसबुकलाही जबाबदार धरण्यात आले. यानंतर फेसबुकवर चौकशीही लावण्यात आली होती. यानंतर फेसबुकने त्यांची पॉलिसी अमेरिकेसह भारतातही बदलली होती. मात्र, आज जाहीर झालेल्या या धक्कादायक खुलाशाने अमेरिकेमध्ये खळबळ उडाली आहे.
न्य़ूयॉर्क टाईम्सने मंगळवारी याची माहिती दिली आहे. फेसबुकचे उपाध्यक्ष अँड्र्यू बोसवर्थ यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेला मेमो फेसबूकवर पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी याचा वापर सार्वजनिक स्वरूपात करू नये असेही म्हटले होते. एका उदारवादीच्या स्वरूपात मी ट्रम्प यांना पुन्हा विजयापासून रोखण्यासाठी कोणताही निर्णय़ घेण्यास तयार आहे. कारण निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करणे आमिष दाखविण्यासारखे आहे. आम्ही असे करू नये, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.
याचबरोबर त्यांनी ट्रम्प यांच्या विजयासाठी राजकीय जाहीरात टूलच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. हेच टूल पुन्हा ट्रम्प यांना निवडून येण्यास मोठी मदत करणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. बोसवर्थ हे फेसबुकचा मालक झकरबर्गचे अत्यंत जवळचे आहेत. त्यांनीच अशाप्रकारे आरोप केले आहेत. ट्रम्प यांना जिंकायला फेसबुकने मदत केली का? या प्रश्नाचे उत्तर हो असेल. ट्रम्प यांची विजय रशिया आणि केंब्रिज अॅनालिटीकाच्या मदतीने झालेला नाही. ते अशासाठी निवडले गेले कारण डिजिटल दुनियेत ते सर्वात पुढे होते आणि सर्वोत्कृष्ट प्रचारक ठरले. स्वताला चांगल्या पद्धतीने प्रस्तुत करणारा त्यांच्याएवढा हुशार माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही. ब्रैड पार्स्केल यांनी मोठे काम केले, असेही बोसवर्थ यांनी यामध्ये म्हटले आहे.