मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकच्या कर्मचा-यांसाठी ड्रेसकोड

By Admin | Published: September 27, 2015 04:43 PM2015-09-27T16:43:02+5:302015-09-27T16:43:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुकच्या मुख्यालयातील भेटीची सर्वत्र उत्सुकता असली तरी मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने सर्व कर्मचा-यांना ड्रेसकोड लागू केला आहे.

Dress code for Facebook employees on the backdrop of Modi's visit | मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकच्या कर्मचा-यांसाठी ड्रेसकोड

मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकच्या कर्मचा-यांसाठी ड्रेसकोड

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

न्यूयॉर्क, दि. २७ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुकच्या मुख्यालयातील भेटीची सर्वत्र उत्सुकता असली तरी मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने सर्व कर्मचा-यांना  ड्रेसकोड लागू केला आहे. मोदींच्या भेटीदरम्यान सर्व कर्मचा-यांनी फॉर्मल कपडेच घालावे असे निर्देश फेसबुकने कर्मचा-यांना दिले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौ-यावर असून रविवारी मोदी सिलिकॉन व्हॅलीतील मेनलो पार्क येथील फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी व फेसबुकमधील कर्मचारी यांच्यात प्रश्नोत्तराचा तासही रंगणार आहे. त्यामुळे मोदींच्या फेसबुक वारीची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र मोदींच्या या भेटीसाठी फेसबुकने कर्मचा-यांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. कंपनीतील महिला व पुरुष कर्मचा-यांनी मोदींच्या भेटी दरम्यान फॉर्मल कपड्यांमध्ये उपस्थित राहावे असा ईमेल कर्मचा-यांना पाठवण्यात आला आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग स्वतः जीन्स व टी - शर्टमध्ये कार्यालयात वावरतो. अन्य कर्मचा-यांनाही यापूर्वी कधीही ड्रेसकोड लागू करण्यात आलेला नव्हता. 

एखाद्या मोठ्या नेत्याशी भेट घेताना झुकेरबर्ग नेहमीच सूट परिधान करतो. बराक ओबामा व भारतात नरेंद्र मोदींची भेट घेतानाही झुकेरबर्ग सुटाबूटात दिसला होता. त्यामुळे या ड्रेसकोडच्या निर्णयात वेगळे असे काहीच नाही याकडे जाणकारांनी लक्ष वेधले आहे. 

Web Title: Dress code for Facebook employees on the backdrop of Modi's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.