मसाज दरम्यान लैंगिक शोषणाचा आरोप, Elon Musk ने उडवली खिल्ली!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 03:06 PM2022-05-21T15:06:13+5:302022-05-21T15:08:45+5:30
Elon Musk : या प्रकरणाची सेटलमेंट करण्यासाठी महिलेला २ कोटी रूपयेही देण्यात आले. ट्विटरवर याबाबत एका अमेरिकन बिझनेसमनने एलन मस्कवर टिका केली.
एलन मस्क (Elon Musk) हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. तो नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. नुकताच त्याच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण (Sexual misconduct allegation) केल्याचा आरोप केला. दावा करण्यात आला की, या प्रकरणाची सेटलमेंट करण्यासाठी महिलेला २ कोटी रूपयेही देण्यात आले. ट्विटरवर याबाबत एका अमेरिकन बिझनेसमनने एलन मस्कवर टिका केली. ज्यावर मस्कने खिल्ली उडवत उत्तर दिलं.
Business Insider च्या रिपोर्टनुसार लैंगिक शोषणाचं हे प्रकरण २०१६ मधील आहे. महिला कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एलन मस्कच्या एअरोस्पेस फर्म SpaceX मध्ये फ्लाइट अटेंडेंटचं काम करत होती. मस्कवर या महिलेला प्रायव्हेट दाखवणे आणि विना परवानगी तिच्या पायांवरून हात फिरवण्याचा आरोप आहे. आरोप महिलेच्या एका मैत्रिणीने एक घोषणापत्र जारी करून लावला आहे. कारण करारानुसार पीडित महिलेने एका नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंटवर साइन केली होती.
रिपोर्टनुसार, मस्कने महिला कर्मचारीला इरॉटिक मसाज देण्याच्या बदल्यात घोडा खरेदी करून देईन अशी ऑफर दिली होती. दावा केला गेला की, या प्रकरणाच्या सेटलमेंटसाठी २०१८ मध्ये महिला कर्मचारीला २ कोटी रूपयेही देण्यात आले होते. या बातमीनंतर अमेरिकन बिझनेसमन Chad Hurley ने मस्कवर टिका केली.
🤣🤣
— Elon Musk (@elonmusk) May 20, 2022
Hi Chad, long time no see!
Fine, if you touch my wiener, you can have a horse.
त्यांनी ट्विटरवर एलन मस्कला टॅक करत लिहिलं की, 'हॅलो Elon Musk, स्टॉप हॉर्सिंग आणि हे ट्विटर डील बंद कर. आम्हा सर्वांना एक सुखद अंत हवा आहे'. Chad Hurley च्या ट्विटला उत्तर देत मस्क म्हणाला की, 'Hi Chad, बरेच दिवस झाले भेट नाही. ठीक आहे. जर तू माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला तर तुझ्याकडेही एक हॉर्स असू शकतो'.
रिपोर्टनुसार, लैंगिक शोषणाच्या आरोपावरील एक मेलच्या उत्तरात एलन मस्कने लिहिलं की, जर तो लैंगिक शोषणासारख्या प्रकरणात असता, तर त्याच्या ३० वर्षाच्या करिअरमध्ये कुणी कधीच कसं काही बोललं नाही. मस्कने हे राजकारण असल्याचं म्हटलं.