चीनच्या मिलिट्री एक्सपर्ट्सनी एक स्टडी सादर केली आहे. यात सॅटेलाइट विरोधी क्षमतांसंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. आश्यकता भासल्यास ड्रॅगन याचा वापर स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक्स सॅटेलाइट्सला नष्ट करण्यासाठीही करू शकतो.
चीनच्या वैज्ञानिकांनी केला अभ्यास -साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅकिंग अँड टेलिकम्युनिकेशनचे संशोधक रेन युआनझेन यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला आहे. यात चीनच्या संरक्षण उद्योगाशी संबंधित असलेले वैज्ञानिक सह-लेखक होते. 'A Mix of Soft and Hard Kill Methods' नावाच्या रिपोर्टमध्ये काही अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यांच्या माध्यमाने स्टारलिंक्सचे काही सॅटेलाइट्स निष्क्रिय केले जाऊ शकतात.
स्टारलिंक हे मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीकडून चालविले जाणारे सॅटेलाईट कॉन्सटलेशन सिस्टिम आहे. यात पॉथ्वीच्या खालच्या कक्षेत 2400 सॅटेलाइट्स फिरतात. याच्या माध्यमाने पृथ्वीवर कुठेही सुपरफास्ट इंटरनेट पाठवले जाऊ शकते.
इलॉन मस्क यांच्या कंपनीच्या या सिस्टिमचे जबरदस्त कौतुक होत असते. कारण या सिस्टिममुळे विकसनशील आणि जगातील दुर्गम देशांतही इंटरनेट चालू शकते. मात्र, याचा परिणाम आपल्या मिल्ट्रीवर तर होणार नाही, ना याची चिंता चीनला सतावत आहे.