लंडण - एका 5 वर्षीय मुलाच्या समजूतदारपणामुळे आणि सतर्कतेमुळे त्याच्या आईचा जीव वाचला आहे. ही घटना आहे इंग्लंडमधील टेलफोर्ड येथील. या मुलाची आई बेशुद्ध होऊन पडली होती. जर त्यांना योग्य वेळी रुग्णालयात नेण्यात आले नसते, तर त्यांचा मृत्यू होण्याची अथवा त्या कोमात जाण्याचीही शक्यता होती. मात्र, त्यांच्या मुलाने जे काही केले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
खेळण्यातील अँब्यूलन्सवरील क्रमांक आला कामी - झाले असेल, की जॉश चॅपमॅन आपल्या भावासोबत खेळत होता. याच दरम्यान त्याची आई जमिनीवर पडल्याचे त्याने पाहिले. यानंतर, क्षणाचाही विलंब न करता जॉशने आपल्या खेळण्यातील अँब्यूलन्सवर असलेला 112 हा इमरजंसी क्रमांक डॉयल केला आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
मृत्यू होण्याचीही होती शक्यता -संबंधित पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी थोडा विलंब झाला असता, तर जोशच्या आईचा मृत्यूही होण्याची शक्यता होती. माहिती मिळताच, पोलीस त्याच्या आईला घेऊन डॉक्टरांकडे गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना समजले, की त्या डायबेटीक कोमात आहेत. त्यांची शूगर लेवल अत्यंत कमी झाली होती. जोशने दाखवलेल्या समजदारपणाबद्दल आणि सतर्कतेबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्याचे कोतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य
खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना
"माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही"
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार
मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण