इथिओपियाचे विमान कोसळले, 157 प्रवासी करत होते प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 03:49 PM2019-03-10T15:49:09+5:302019-03-10T15:49:37+5:30

इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाल्याचे वृत्त आहे.

Ethiopian airplane crash, 157 passengers were traveling | इथिओपियाचे विमान कोसळले, 157 प्रवासी करत होते प्रवास

इथिओपियाचे विमान कोसळले, 157 प्रवासी करत होते प्रवास

Next

नैरोबी - इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमानअपघातग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. या विमानातून 149 प्रवासी आणि 8 कर्मचारी प्रवास करत होते. दरम्यान, या अपघातात अनेक प्रवासी मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इथिओपियाच्या पंतप्रधानांनीही या अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

इथिओपिया एअसलाइन्सचे हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजून 38 मिनिटांनी आदिस अबाबा येथून नैरोबीकडे रवाना झाले होते. दरम्यान, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाशी असलेला संपर्क तुटला. दरम्यान, अपघातग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. 





आदिस अबाबापासून 60 किमी अंतरावर असलेल्या बिशोफ्टू येथे हा अपघात झाला आहे. ज्या विमानाला अपघात झाला आहे ते 737-800 मॅक्स प्रकारातील होते. दरम्यान, इथिओपियाच्या पंतप्रधानांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.  

Web Title: Ethiopian airplane crash, 157 passengers were traveling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.