फेसबुकने पुरेशा उपाययोजना केल्या नव्हत्या, ही माझी घोडचूक; मार्क झुकरबर्ग यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 02:28 AM2018-09-08T02:28:28+5:302018-09-08T02:28:44+5:30

खोटी माहिती व अफवांचा प्रसार रोखण्यासाठी फेसबुकने पुरेशा उपाययोजना केल्या नव्हत्या, अशी कबुली या समाजमाध्यमाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.

Facebook did not make adequate measures, this is my blunder; Mark Zuckerberg's confession | फेसबुकने पुरेशा उपाययोजना केल्या नव्हत्या, ही माझी घोडचूक; मार्क झुकरबर्ग यांची कबुली

फेसबुकने पुरेशा उपाययोजना केल्या नव्हत्या, ही माझी घोडचूक; मार्क झुकरबर्ग यांची कबुली

Next

वॉशिंग्टन : खोटी माहिती व अफवांचा प्रसार रोखण्यासाठी फेसबुकने पुरेशा उपाययोजना केल्या नव्हत्या, अशी कबुली या समाजमाध्यमाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.
युरोपियन युनियनच्या ब्रुसेल्स येथील मुख्यालयात त्यांनी हे उद्गार काढले. ते म्हणाले की, फेसबुकचा वापर दुसऱ्यांच्या निंदानालस्तीसाठी तसेच खोट्या बातम्या पेरण्यासाठी केला जाईल, असा विचार आम्ही केला नव्हता. फेसबुकवरील वापरकर्त्यांची माहिती चोरून तिच्या आधारे विविध देशांतील निवडणुकांमध्ये मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जाईल, असेही कधी वाटले नव्हते. ही माझ्याकडून झालेली घोडचूक आहे. ती सुधारण्यासाठी आता उपाय योजले आहेत. याबाबत आम्ही सजग राहायला हवे होते, असेही झुकरबर्ग म्हणाले.

Web Title: Facebook did not make adequate measures, this is my blunder; Mark Zuckerberg's confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.