धक्कादायक! महिला सब-इन्स्पेक्टरला दिवसाढवळ्या किडनॅप केलं, रेप करून पोलीस स्टेशनजवळ फेकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 12:19 PM2021-09-06T12:19:07+5:302021-09-06T12:20:12+5:30
लैंगिक गुन्हे अधिकारी म्हणून काम करणारी महिला सब इन्स्पेक्टरला ती केस संदर्भात घटनास्थळी गेली असताना किडनॅप केलं होतं.
इमरान खानच्या 'नव्या पाकिस्तानात' सामान्य महिला तर सोडात खाकी वर्दीतील महिलाही सुरक्षित नाही, याचं उदाहरण दाखवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबच्या मुजफ्फरगढ जिल्ह्यात एका महिला सब इन्स्पेक्टरचं अपहरण करून तिच्या रेप करण्यात आला. लैंगिक गुन्हे अधिकारी म्हणून काम करणारी महिला सब इन्स्पेक्टरला ती केस संदर्भात घटनास्थळी गेली असताना किडनॅप केलं होतं. पोलिसांनी आरोपी विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
डॉनच्या रिपोर्टनुसार, २९ वर्षीय सब इन्स्पेक्टरला सिटी पोलीस स्टेशनजवळ एका केसची चौकशी करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. ती तिथे पोहोचल्यावर तिथे आधीच उपस्थित असलेल्या व्यक्तीने पिस्तुलचा धाक दाखवत तिला कारमध्ये बसवलं आणि चमन बायपास भागातील एका निर्जन स्थळी घेऊन गेला. (हे पण वाचा : Afghanistan Taliban Crisis : तालिबानचा क्रूर चेहरा उघड! कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या)
आरोपीने इथे महिला सब इन्स्पेक्टरसोबत मारहाण केली आणि नंतर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी महिलेला बेशुद्धावस्थेत ऑफिसच्या जवळ फेकून फरार झाला. पोलिसांनी सांगितलं की, सब-इन्स्पेकटरला जखमी स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तसेच आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून घटनेसाठी वापरलेली कारही ताब्यात घेतली आहे. सूत्रांनी सांगितलं की आरोपी इतरही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे.
दुसऱ्या घटनेत मुलासोबत गॅंग रेप
एका दुसऱ्या घटनेत चौक सरवर शहीद भागात एका नऊ वर्षाच्या मुलासोबत तीन संशयितांनी गॅंगरेप केला. मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी शासकीय हायस्कूलच्या स्पोर्ट्स फिल्डमध्ये गेला होता. तेथून परत येत असताना त्याला किडनॅप केलं आणि त्याच्यावर गॅंगरेप केला. त्यानंतर मुलाला तिथेच सोडून आरोपी फरार झाले. पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.