नवी दिल्ली : चीनच्या सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय दलाने केलेली खास विनंती मान्य करून फ्रान्स राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीत चारऐवजी सहा विमाने भारताला तातडीने देणार आहे.
हवाई दलाच्या प्रवक्त्याने याला दुजोराही दिला नाही वा इन्कारही केला नाही. मात्र या व्यवहारांची अगदी जवळून माहिती असलेल्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की,आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार शस्त्रे व क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे सुसज्ज असलेल्या चार विमानांची पहिली तुकडी हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर २७ जुलै रोजी पोहोचविली जाणार होती. परंतु तातडीच्या गरजेसाठी हवाई दलाने खास विनंती केल्याने आता सहा विमाने पुरविली जाणार आहेत.
सूत्रांनुसार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी २ जून रोजी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री प्लॉरेन्स पार्ले यांच्याशी टेलिफोनवरून चर्चा केली तेव्हा कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ सुरु असले तरी भारताला राफेल विमानांची पहिली खेप ठरल्या तारखेला सुपूर्द करण्याची हमी फ्रान्सकडून देण्यात आली. करारानुसार भारत ५९ हजार रुपये कर्च करून एकूण ३६ राफेल विमाने खरेदी करणार आहे.चीनला बसेल जरबअत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज अशा राफेल लढाऊ विमानांनी हवाईदलाच्या मारकक्षमतेस मोठे बळ तर मिळेलच. शिवाय सीमेवर डोळे वटारणाऱ्या चीनलाही त्यामुळे जरब बसेल, असे जाणकारांना वाटते. ३६ पैकी ३० विमाने प्रत्यक्ष युद्दसज्जतेसाठी व चार प्रशिक्षणासाठी वापरली जातील. या विमानांची एक स्वाड्रन अंबाला येथे तर दुसरी प. बंगालमध्ये हाशिमारा येथे तैनात केली जाईल.