Maldives vs India Drone Contract : भारतासोबतचा वाद आणि चीनमधून परतल्यानंतर मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या दृष्टिकोनात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. चीन दौऱ्यात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनसोबत २० करारांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तशातच आता मालदीवने तुर्कीकडून ड्रोन खरेदी करण्याचा करार केला आहे. भारतासोबतच्या वादानंतर मालदीव आता संरक्षण साधनांमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहे. त्यासाठीच लष्करी ड्रोनची खरेदी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी त्याने तुर्किसोबत मोठा करार केला आहे. या करारासाठी मालदीव सरकारने सुमारे २५९ कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अर्थ मंत्रालयाने आता बजेटचा काही भाग MNDF ला देखील दिला आहे.
ड्रोन खरेदी केल्यानंतर आपल्या क्षेत्रावर २४ तास पाळत ठेवण्याचा लष्कराचा मानस आहे. मात्र, मालदीव तुर्कीकडून किती ड्रोन खरेदी करत आहे, याची माहिती नाही. त्याचवेळी एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, किमान तीन ड्रोन खरेदी केले जातील. मालदीव सरकारने लष्करी ड्रोन खरेदीसाठी तुर्कीच्या कंपनीसोबत करार केला आहे. या करारानुसार मालदीवला या वर्षीच संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे.
भारतासोबतचा वाद आणि चीनमधून परतल्यानंतर मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचा दृष्टिकोन सतत बदलताना दिसत आहे. चीनमधून परतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मुइझू यांनी मालदीव सैन्याचा विस्तार करण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले होते. याआधी मालदीवच्या राष्ट्रपतींनी चीनसोबत 20 करारांवर स्वाक्षरी केली होती.
मालदीवची हिंद महासागरातील व्याप्ती सर्वाधिक
भारतासोबतच्या वादानंतर मालदीवच्या राष्ट्रपतींनी हिंदी महासागर ही कोणत्याही विशिष्ट देशाची मालमत्ता नसल्याचे म्हटले होते. मालदीव हा ९ लाख एकर सागरी क्षेत्र असलेला मोठा देश आहे. मालदीव हा हिंदी महासागराचा सर्वात मोठा भागधारक आहे. चीनचे समर्थक मुइज्जू यांनी काही दिवसांपूर्वी बीजिंगला भेट दिली होती. यावेळी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतली होती. या भेटीत मुइज्जू यांनी चीनची स्तुती केले होते.