ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. 7 - भारताशी नेहमी स्पर्धा करु पाहणा-या पाकिस्तानने आता भारतापेक्षा उंज ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वाघा बॉर्डरवर 400 फूट उंच ध्वजस्तंभावर पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. मार्च महिन्यात भारताकडून भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला होता. या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. भारताने ध्वज उभारल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली होती. इतकंच नाही तर भारत हेरगिरी करत असल्याचा आरोप करत कांगावा करण्यासही सुरुवात केली होती.
आणखी वाचा -
अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा
अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा
राज्यातील सर्वात उंच ध्वजस्तंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने ध्वजस्तंभ उभा करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. ज्या ठिकाणी ध्वजस्तंभ उभा करण्यात येणार आहे तेथील झाडे कापली जात आहेत. जर का सर्व काही नियोजनप्रमाणे पार पडलं तर हा जगातील आठवा सर्वात उंच ध्वज असेल.
याचवर्षी 5 मे रोजी भारताने 360 फूटावर तिरंगा उभारतला, मात्र जोरात वाहणा-या वा-यामुळे काही दिवसातच तो फाटला होता, ज्यामुळे तो बदलावा लागला होता. तिरंग्याची काळजी घेताना अधिका-यांना अनेक समस्या जाणवत आहेत. आतापर्यंत पाचवेळा तिरंगा बदलावा लागला आहे. ध्वजस्तंभालाही अद्याप तिरंग्याचा रंग देण्यात आलेला नाही. भारत - पाकिस्तान सीमारेषेवर बीटिंग रीट्रीट कार्यक्रमादरम्यान तिरंगा खाली पडल्याने भारतीय अधिका-यांची अडचण झाली होती.
वाघा बॉर्डरवर ध्वज उभारण्याच्या निर्णयामागे मानसिकतेशिवाय दुसरं कारण असू शकत नाही. भारताने अटारी सीमेवर उभा केलेला ध्वज लाहोरमधूनही दिसत असल्याने पाकिस्तानी अधिका-यांना जनतेमधील आपली प्रतिष्ठा कमी झाल्याचं वाटत असावं. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा", असं बीएसएफचे माजी अधिकारी डी एश सारन बोलले आहेत. यामागे कोणतंही दुसरं कारण असल्याची शक्यता त्यांनी नाकारली आहे.
अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा
मार्च महिन्यात भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. हा देशातील सर्वांत मोठा तिरंगा असल्याचे सांगितले जाते. या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. रांचीतील ९१.४४ मीटर (३०० फूट) उंच ध्वज स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले. सीमेपासून १५० मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने ३.५० कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आणली. हा भारतीय ध्वज इतका उंच आहे की तो पाकिस्तानातील लाहोर शहरातूनही सहजपणे दिसू शकेल, असे सांगण्यात आले होते.