फ्लॉरेन्स लघुग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळून जाणार, ८०० लघुग्रहांची भाऊगर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:02 AM2017-08-20T00:02:50+5:302017-08-20T00:02:57+5:30
४.४ चौ. किमी आकाराचा फ्लॉरेन्स नावाचा लघुग्रह येत्या १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार असून त्यामुळे कोणताही धोका नसल्याची खात्री वैज्ञानिकांनी दिली आहे.
वॉशिंग्टन : ४.४ चौ. किमी आकाराचा फ्लॉरेन्स नावाचा लघुग्रह येत्या १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार असून त्यामुळे कोणताही धोका नसल्याची खात्री वैज्ञानिकांनी दिली आहे. फ्लॉरेन्स लघुग्रहाची ही फेरी पृथ्वीपासून ७० लाख किमी म्हणजेच पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतराहून १३ पट अधिक दूरवरून होणार असली तरी ती लक्षणीय आहे. याचे कारण असे की, ‘नासा’ने अंतराळात स्वैरपणे भ्रमण करणाºया लघुग्रहांवर देखरेख ठेवण्याचे काम २० वर्षांपूर्वी सुरु केल्यापासून एवढ्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. आॅगस्टच्या अखेरच्या व सप्टेंबरच्या सुरवातीच्या दिवसात छोट्या दुर्बिणीतून फ्लॉरेन्स लघुग्रह दिसू शकेल. याआधी १२७ वर्षांपूर्वी म्हणजे सन १८९० मध्ये या लघुग्रहाने पृथ्वीच्या एवढ्या जवळून भम्रण केले होते.
शेल्टे बस या खगोल वैज्ञानिकाने सन १९८१ मध्ये आॅस्ट्रेलियातील एका प्रयोगशाळेतून निरीक्षण करताना फ्लॉरेन्स लघुग्रहाचा शोध लावला होता. आधुनिक नर्सिंगची मुहूर्तमेढ रोवणाºया मिसेस फ्लॉरेन्स नाईटेंगेल यांचे नाव या उपग्रहास देण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
८०० लघुग्रहांची भाऊगर्दी
‘नासा’ंनुसा निश्चित भ्रमणकक्षा नसलेले सुमारे ८०० लघुग्रह अंतराळात आहेत. फ्लॉरेन्स हा त्यातील सर्वात मोठा आहे. यापूर्वी असे लघुग्रह पृथ्वीवर आदळून विनाश घडला आहेत. ताजी घटना सन २०१३ च्या पूर्वार्धात घडली होती. तेव्हा
२० मीटर लांबीचा व १० हजार टन वजनाचा एक लघुग्रह रशियात आदळला होता.अनेक लोक जखमी होण्याखेरीज हजारो चौ.किमी क्षेत्रातील जंगल त्यामुळे खाक झाले होते.