इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. शाहिद खकान अब्बाशी यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाने (एनएबी) अटक केल्याचे वृत्त येथील मीडियाने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील एलएनजी घोटाळ्याप्रकरणी शाहिद खाकान अब्बासी यांना आज कोर्टात हजर राहायचे होते. मात्र, शाहिद खाकान अब्बासी कोर्टात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. शाहिद खतान अब्बासी यांच्यावर 1999 च्या कलम 9 (अ) नुसार भ्रष्टाचाराअंतर्गत राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाने कारवाई केली आहे.
दरम्यान, याआधी पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाने माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनाही आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे. आता माजी माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनाही अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.