जेरूसलेम : गाझा सिटी खाली करण्यासाठी इस्रायलने शनिवारी दुपारी चारपर्यंत दिलेली मुदत संपली आहे. गाझाच्या सीमेवर इस्रायलने मोठ्या प्रमाणात रणगाडे तैनात केले आहेत. नागरिक मिळेल त्या मार्गाने गाझा सोडण्यासाठी धडपडत आहेत.
इस्रायलने गाझाची वीज तोडली आहे. पाणी कधीही संपू शकते, अशी स्थिती आहे. आतापर्यंत ४ लाखांहून अधिक जणांनी गाझा सोडले आहे. गाझामधील २० लाख लोकांचे जीव धोक्यात आहेत, अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)
हमासचा कंमाडर अली कादी मारला गेलाकाही दिवसांपूर्वी इस्रायलवर हल्ला करणारा हमासचा कमांडर अली कादीला इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेला. हमासच्या एअरफोर्सचा प्रमुख मुराद अबू मुराद हा सुद्धा इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये ठार झाला आहे.